क्राईम न्युज

सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाला शिवाजीनगर कोर्टाकडून फाशीची शिक्षा

Spread the love

मावळ :मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील सात वर्षांच्या मुलीचे 2 ऑगस्ट 2022 रोजी अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हृदयद्रावक घटनेनंतर कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी तेजस दळवीला अटक केली होती.
या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज (शुक्रवारी, दि. 22) शिवाजीनगर सत्र न्यायालयात पार पडली. आज अंतिम सुनावणी होऊन आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तेजस दळवी याच्या आईचा देखील या गुन्ह्यात सहभाग आढळला होता. खुनाच्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा तिने प्रयत्न केला होता. त्याबाबत तिला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!