क्राईम न्युज

पिंपरीतील ‘शेअरमार्केट घोटाळ्याचे’ धागेदोरे थेट बँकॉकपर्यंत

देशभरात १७७ फसवणुकीच्या तक्रारी

Spread the love

पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरात शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याच्या आरोपावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात चौघांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करताना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलला या प्रकरणाचे धागेदोरे थेट देशाबाहेर बँकॉक पर्यंत असल्याचे आढळले असून देशभरात १७७ फसवणुकीच्या तक्रारी या प्रकरणात आल्या आहेत.१०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा आजपर्यंत प्रकाशात आला असून त्याची व्याती आणखीही वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती संदीप डोईफोडे उपायुक्त(गुन्हे) यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीसठाण्यात काही दिवसांपूर्वी IBKR, Cresset Acadamy, Goldman Sachs या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवरून गुंतवणुकीवर भरपूर परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाली असल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली. त्यातील दोघे गुजराथ येथील आहेत. या प्रकरणाचा सायबरसेलद्वारे तपास करून गुजराथ येथील अमित जगदिशचंद्र सोनी यास ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सांगीतले की तो सोन्याचे व्यापारी यांच्याकडुन सोने घेऊन त्याचे कॅश मध्ये रुपांतर करुन अहमद नजीर गाझी याला देत होता. अहमद नजीर गाझी हा ती कॅश मुफद्दल व त्याचा भाऊ नामे आबिद याला यु.एस.डी.टी. मध्ये क्रिप्टोकरन्सी खरेदी करुन पाठवत होता. आरोपी अहमद याचा सख्खा भाऊ आबिद व मुफद्दल हा बँकॉक येथे राहून तेथिल आंतराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीसोबत काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आरोपीने अद्यापपर्यंत ६ अकाऊंटमधील पैसे काढून त्याचे यु.एस.डी.टी मध्ये रुपांतर करून ते बँकॉक येथे पाठविल्याचे उघडकीस आले. आरोपीच्या एकूण ६ अकाऊंटविरुध्द भारतामध्ये एकूण १७७ तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत. अद्यापपर्यंत १०० कोटीपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा उघडकीस आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,अपर आयुक्त वसंत परदेशी,उपआयुक्त संदिप डोईफोडे, गुन्हे पिंपरी चिंचवड, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ निरीक्षक वैभव वैभव शिंगारे,सहायक निरीक्षक सागर पानमंद, प्रविण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, शिपाई अतुल लोखंडे, बिचेवार, कृष्णा गवळी,रजनिश तारु यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!