ताज्या घडामोडी

शिवाजी आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश

Spread the love

शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच त्यांच्यासह शेकडो शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, आमदार दिलीप मोहिते पाटील, उपस्थित होते.

दरम्यान, शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे आढळराव पाटील अशी लढत आता बघायला मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!