ताज्या घडामोडी

नववर्षाची गझलमय सुरवात गुगल मीटवर नववर्षाच्या स्वागताचे औचित्य मुशयरा सदा बहार कार्यक्रम

Spread the love

अखिल महाराष्ट्र साहित्य मंच या समूहाचे सन्मा. अध्यक्ष योगेश चाळके सर व पंचकमिटी आयोजित इल्म – ए – गझल ग्रुपचा गझल मुशायरा व सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून 2 जानेवारी 2022 रोजी रात्रौ ठिक ९:30 ते १२ वाजेपर्यंत मुशायरा गूगल मिटवर फार आनंददायी झाला .
या प्रसंगी उद्घाटन सोहळा मा.डाॅ. विजया यांच्या हस्ते पार पडला.एक प्रकर्षाने जाणवले की सर्वांच्याच गझलमध्ये वैविध्यता तर होतीच तसेच कांही शेर ऐकताच ” वाह ! ” अशी दाद मनाने किती नकळत दिली . आ . योगेश सरांचे मार्गदर्शनपर अध्यक्षीय भाषण पण नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण तर होतेच शिवाय हसत खेळत कोपरखळ्या देत केले जाणारे गझल संस्कार मनाला फार भावले . आयोजन , निवेदन , सूत्रसंचलन या बाबत तर सरांसह – आरती लाटणे , स्वाती काळे , प्रिया मयेकर तसेच अतूल दिवाकर सर यांनी सुंदर संगम साधला .
तसेच गझल मुशय-यातील सहभागी सर्व सदस्य सन्मा. श्री अतुल दिवाकर, आरती लाटणे , प्रिया मयेकर, स्वाती काळे भारती नाईक अरुण सावंत, अशोक कांबळे, राजेश नागुलवार, शिल्पा सकपाळे, सीमा झुंजारराव सिंधु बोदले डाॅ. विजया नवले, मनोज दीक्षित हेमंत रत्नपारखी ,गौरी शिरसाठ सदस्यांचे विषेश कौतूक . दर्जेदार शेर ऐकवीत फार सहज सुंदर गुंफण केली होती त्यांनी त्यामुळे ऐकता ऐकता “वाजले की बारा ” याचेही भान राहीले नाही . इल्म – ए – गझल ग्रुपच्या नववर्षाच्या उपक्रमांची सुंदर सुरुवात केल्याबदलआ . योगेश सरांचे आणि सर्व गझल स्नेहींचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रम सन्माननीय योगेश सरांच्या गझल ने समाप्ती झाली ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!