ताज्या घडामोडी

राष्ट्रीय गौरव सर्वोत्कृष्ट अग्रेसर वैद्यकीय नायक 2022 या पुरस्काराने डॉ. विजयकुमार मोहिते सन्मानित

Spread the love

सातारा : यंदाचा अंतराष्ट्रीय सामाजिक न्याय आयोगाकडून तोंडोली येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे व पंचक्रोशीतील प्रख्यात डॉ.विजयकुमार मोहिते यांना राष्ट्रीय गौरव सन्मान अंतर्गत सर्वोत्कृष्ट अग्रेसर वैद्यकीय नायक या पुरस्काराने आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.संतोष बजाज ,माजी आमदार दिलीपराव येळगावकर,हरणाई सुतगिरणीचे संस्थापक चेअरमन श्री.रणजितभैय्या देशमुख यांच्याहस्ते सन्मानित करणेत आले.यावेळी उपस्थित मान्यवर कांग्रेस नेते संजीवभाऊ साळुंखे, मानसिंगराव जगदाळे व आयोगाचे पदाधिकारी राजस्थानहून आलेले मुख्य सचिव सुरेश कुमार,राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी बाबूलाल यादव,हरियाणा हून आर टी आय चे अध्यक्ष रावसाहेब धनवीर,गोव्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा ऐश्वर्या साळगावकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना सन्मानित करण्यात येते.यावर्षी चा कार्यक्रम सातारा येथील प्रीतीएक्झिक्युटिव्ह या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी आयोगाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.तोंडोली गावचे सुपुत्र डॉ विजयकुमार मोहिते यांची वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरी व सामाजिक कार्यात असणारे योगदान व लॉकडाउन काळातील जनतेची केलेली सेवा या कार्याचा आढावा घेऊन यावर्षीचा आयोगाकडून सर्वोत्कृष्ट अग्रेसर वैद्यकीय नायक म्हणून प्रशस्तीपत्र,शाल,सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.विश्वदीप आपगे, पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष अमरदीप आपगे,सातारा जिल्हा अध्यक्ष प्रशांत देशमुख, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष डॉ. संतोष डांगे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुशांत सुर्यवंशी जिल्हा कार्यक्रम संयोजक मिलिंद देशमुखे, मुंख्य वाद निवारण अधिकारी कृष्णत पाटिल ,सचिव बाबासाहेब कुंभार, प्रशांत रत्नपारखी, रूपेश पूंडेकर व अन्य पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमचे सुत्रसंचालन राहुल कोळी यांनी केले व आभार प्रदर्शन अमरदीप आपगे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!