ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती च्या वतीने गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना निवेदन

Spread the love

दोन तास शासनाच्या विरोधात घोषणा…

शिराळा प्रतिनिधी :

सोमवारी शिराळ्यात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती च्या वतीने गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना देत सुमारे दोन तास शासनाच्या विरोधात घोषणा देऊन पंचायत समितीचे आवार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दणाणून सोडले. शिराळा तालुक्याच्या वतीने या आंदोलनाचे नेतृत्व तालुका अध्यक्ष सौ अलका विभुते, उपाध्यक्ष सौ सरला घोडे पाटील, सचिव सौ हसीना मुलानी भारती पावले, पुष्पा पाटील, श्रीमती अलका मस्के, संगीता सागावकर यांनी केले.

महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथील मोर्चामध्ये मान्य करून देखील अद्याप तसा शासन आदेश काढलेला नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना शासनाने वाटाण्याच्या अक्षता लावून अद्याप पर्यंत त्या मान्य केलेले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या राज्यातील महिलांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीवर मोर्चा काढून गटविकास अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्याप्रमाणे शिराळा तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी देखील आज गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. तत्पूर्वी बाल विकास प्रकल्प अधिकारी सतीश नवले व पोलीस निरीक्षक सुरेश चिलावार यांना देखील निवेदन दिले आहे.त्यानंतर सेविकांनी आक्रमक होत पंचायत समितीचा परिसर आक्रमक घोषणांनी दणाणून सोडला.

निवेदन दिल्यानंतर पंचायत समितीच्या बाहेर सर्व अंगणवाडी सेविका यांनी ‘मानधन नको वेतन हवे, मानधनाच्या निम्मे पेन्शन हवे, सब एक है, हमारी युनियन हमारी ताकद’ अशा प्रकारच्या घोषणा अंगणवाडी सेविकांनी दिल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!