ताज्या घडामोडी

सांगलीतील महिलांकडून वासोटा किल्ल्यावर शिवजयंती साजरी

Spread the love

सांगली जिल्ह्यातील ६० महिला भगिनी; प्रबळ इच्छाशक्तीचे सर्वत्र कौतुक

शिराळा प्रतिनिधी : प्रबळ इच्छाशक्तीचे दर्शन घडविताना सांगली जिल्ह्यातील ६० महिलांनी कोयनेच्या घनदाट अरण्यात वसलेल्या वासोटा किल्ल्यावर पारंपरिक वेशभूषेत शिवजयंती साजरी केली. या सर्वांनी शिवसागरातील बोटिंग अन् जंगल सफारीचा थरारक अनुभव घेतला. दरम्यान, सर्व महिलांनी नऊवारी साडी आणि फेटा बांधून तसेच संस्थेच्या प्रमुखांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसेच मावळ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत महाराष्ट्राचे राज्यगीत व पोवाडा गाऊन ऐतिहासिक पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा केला.

सांगलीतील सह्यगिरी ट्रेक्स अँड अॕडवेंचर या संस्थेच्या वतीने व स्थानिक मार्गदर्शक सुभाष गोरे, पांडुरंग गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंतीनिमित्त वासोटा किल्ला मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात ६० महिला सहभागी झाल्या. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी किल्ला सर केला. त्यांना कोयना अभयारण्याची सैर करण्याची संधीही या निमित्ताने लाभली.

सह्यगिरी ट्रेक्स अँड अॕडवेंचर चे प्रमुख वैभव बंडगर,अजित पाटील,वैभव आंबी,सुरेंद्र सरनाईक यांनी या मोहिमेसाठी पुढाकार घेतला.‌ सहभागी महिलांना स्मृतिचिन्हे अन् प्रमाणपत्रे देण्यात आली. वनविभागाचे अर्जुन चव्हाण यांचे मोहिमेसाठी विशेष सहकार्य लाभले.

घोषणांनी परिसर दणाणला..
“छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय भवानी जय शिवाजी.., अशा घोषणांनी वासोटा परिसर दणाणून गेला होता..

वासोट्याची भ्रमंती हे बहुतेक दुर्गवेड्यांचे स्वप्न असते. या महिलाही त्याला अपवाद नव्हत्या. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने वासोटा मोहिमेत या महिला सहभागी झाल्या. इतकेच काय, त्या यशस्वीपणे किल्ल्यावर पोहोचल्या, हे कौतुकास्पद आहे.
-सुभाष गोरे, स्थानिक मार्गदर्शक अंबवडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!