ताज्या घडामोडी

माधवराव पाटील महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर

Spread the love

मुरुमता. उमरगा, ता. २० (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या व राज्यातील इतर संघटनांच्या वतीने पुकारलेल्या बेमुदत संपात राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. महासंघाच्या व इतर संघटनांच्या वतीने
विविध मागण्या संदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरवा करण्यात आला होता. परंतु शासनाने सदर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत योग्य निर्णय न घेतल्याने राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय कर्मचारी ता.२० फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत संपावर गेले आहेत.

संपाचा पहिला दिवस असून शासनाने त्वरीत योग्य तो निर्णय घ्यावा नसता बेमुदत संप असाच चालू राहील, असे महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे चिटणीस दत्तू गडवे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. यावेळी श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपात सहभागी झाले. यावेळी कार्यालयीन अधिक्षक राजु ढगे, सुभाष पालापुरे, अशोक कलशेट्टी, राजानंद स्वामी, श्रीमती सुरेखा पाटील, लालअहेमद जेवळे, महेश लिमये, आनंद वाघमोडे, महादेव पाटील, मुनीर शेख, प्रभाकर महीद्रकर, दिलीप घाटे, श्रीमती विजश्री भालेराव, मल्लिकार्जुन स्वामी, ईसाअली चाऊस आदींनी शासनाच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!