ताज्या घडामोडी

विटा तहसीदार ऋषिकेश शेळके यांच्या सहकार्यामुळे नागेवाडी कारखान्याची थकीत सहा कोटीची ऊस बिले व्याजासहित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग

Spread the love

विटा प्रतिनधी
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या आर आर सी कारवाई च्या आदेशानुसार विटा तहसीदार ऋषिकेश शेळके यांच्या सहकार्यामुळे नागेवाडी कारखान्याची थकीत सहा कोटीची ऊस बिले व्याजासहित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झाली त्यामुळे स्वाभिमानीच्या वतीने तहसीलदार शेळके यांचा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला
नागेवाडीची बिले मिळणे हे स्वाभिमानीच्या आंदोलनाचे यश आहे आर आर सी कारवाईत 15 टक्के व्याजासाहित बिले द्यावीच लागतात ती कुणाची शेतकऱ्यावर मेहेरबानी नाही तासगावची अर्धी बिले शेतकऱ्यांना मान्य नाहीत पूर्ण बिले दिली नाहीत तर 14 मे ला खा संजयकाका पाटील यांच्या मुलाच्या विवाहात गोंधळ घालू असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला
शेतकऱ्यांसमोर बोलताना खराडे म्हणाले विवाह म्हणजे शुभ प्रसंग आहे त्यात गोंधळ घालणे, आंदोलन करणे चुकीचे आहे योग्य नाही अशोभनीय आहे याची आम्हाला जाणीव आहे पण गेली एक वर्ष शेतकऱ्याच्या घरातील शुभ प्रसंग थांबले आहेत त्यामुळे काकांनी आमच्यावर ती वेळ येवू देवू नये आमची इच्छा नाही गोंधळ घालण्याची काका सर्व रक्कम देतील तशी तरतूद करतील अशी अपेक्षा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेली वर्षभर आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची दखल घेऊन साखर आयुक्तांनी आर आर सी कारवाईचा आदेश दिला त्यानंतर आम्ही मोर्चे, महिला मुंडन आंदोलन, अर्धनग्न मोर्चा, बेमुदत ठिय्या, भीक मागो आंदोलन, आदींसह दहा ते बारा वेळा आंदोलने केली या आंदोलनामुळे 35 कोटी शेतकऱ्यांना मिळाले त्यानंतर आम्ही आर आर सी कारवाईची अमलबजावणी करावी यासाठी आग्रह धरला त्यामुळे तासगाव व नागेवाडी कारखान्याच्या साखर विक्रीचा लिलाव पुकारण्यात आला त्याला प्रथम प्रतिसाद मिळाला नाही मात्र 4 मार्च रोजी नागेवाडी कारखान्याच्या 49 हजार साखर पोत्याचा लिलाव झाला त्यातून 15 कोटी 70 लाख रुपये तहसीलदार विटा यांच्या खात्यावर 24 एप्रिल रोजी जमा झाले सुमारे एक वर्षाचे 15 टक्के व्याजासहित सहा कोटी ऊस बिल शेतकऱ्याच्या खात्यावर 30 एप्रिल रोजी वर्ग झाले आर आर सी कारवाई झाली की ऊस गेल्यानंतर 14 दिवसा नंतर जेवढा कालावधी लागेल तेवढया कालावधी चे व्याज 15 टक्केने शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजासाहित बिल दिले अशी टिमकी कुणी वाजविण्याची गरज नाही बिल तहसीलदारांनी साखरेचा लिलाव करून दिलेले आहे त्यांना लिलाव करायला भाग पाडले आहे
खराडे म्हणाले तासगाव कारखान्याची बिले अद्याप मिळालेली नाहीत ती पूर्ण मिळाली पाहिजेत 50 टक्के बिले घेणे शेतकऱ्यांना मान्य नाही तुम्ही मुलाचा विवाह थाटा माटात करणार आणि शेतकऱ्यांना उपाशी ठेवणार हे चालणार नाही तर नागेवाडी लिलावातील 9 कोटी रुपये तासगावच्या बिलासाठी मिळणार आहेत उर्वरित जी रक्कम कमी पडेल त्याची खा संजय काका पाटील यांनी तरतूद करावी आणि 100 टक्के बिले द्यावीत म्हणजे मुलाला शंभर टक्के आशीर्वाद शेतकरी देतील यावेळी राजेंद्र माने संदीप शिरोटे अमित रवताळे दत्ता जाधव तानाजी धनवडे आखटर संदे अजित चव्हाण,उद्ध व रवताळे प्रशांत शिंदे निशिकांत पोतदार सचिन महाडीक प्रकाश महाडिक प्रदीप लाड भीमराव निकम सुरेश जगताप रवींद्र जगदाळे नामदेव लोखंडे विजय रेंदलकर शाम पवार प्रतीक पाटील विठ्ठल पाटील बाळासो खरमाते बाबासो शिंदे विकास शिंदे अभय शिंदे सिकंदर शिकलगार अशोक पाटील शांताराम पाटील अनिल पाटील सुधाकर जाधव पंढरीनाथ जाधव महादेव दीक्षित विनायक शिंदे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!