क्रीडा व मनोरंजन

विजय स्पोर्ट्सच्या विघ्नेश चौधरीकडे कुमार, तर ज्ञानशक्ती युवाच्या मानसी गायकरकडे कुमारी गटाचे नेतृत्व

Spread the love

४८व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेकरिता ठाण्याचे संघ जाहीर.

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे :- पुणे येथे ५मे पासून होणाऱ्या “४८व्या कुमार/कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी” स्पर्धेकरिता ठाण्याने आपले दोन्ही संघ जाहीर केले.विजय स्पोर्ट्सच्या विघ्नेश चौधरी याच्याकडे कुमार, तर ज्ञानशक्ती युवाच्या मानसी गायकरकडे कुमारी गटाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. नुकत्याच झालेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून हे दोन्ही संघ निवडण्यात आले असून पुणे येथे होणाऱ्या राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत हे दोन्ही संघ ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.निवडण्यात आलेले संघ खालील प्रमाणे.

कुमार गट संघ :- १) विघ्नेश चौधरी-संघनायक – विजय स्पोर्ट्स, २)यश शेळके-ग्रीफीन्स स्पोर्ट्स, ३)आकाश पालकर-ओम न्यू वर्तकनगर, ४)यश भोईर-उजाळा मंडळ, ५)मंगेश सोनावणे-शिवशंकर मंडळ, ६)निखिल भोईर-जय बजरंग, ७)साईराज साळवी-श्री हनुमान मंडळ, ८)दीपक केवट-नवी मुंबई प्रशिक्षण केंद्र, ९)मोहन पुजारी-ग्रीफीन्स स्पोर्ट्स, १०)विशाल पाचारे-चेरोबा स्पोर्ट्स, ११)यश किस्मतराव-जय भीम मंडळ, १२)आदित्य जाधव-विश्वरूप मंडळ.
प्रशिक्षक :- आकाश गायकवाड सहाय्यक :- भूषण भोईर.

कुमारी गट संघ :- १)मानसी गायकर-संघनायिका- ज्ञानशक्ती युवा, २)देवयानी पाटील-संघर्ष मंडळ, ३)दीपाली पगडे-स्फूर्ती स्पोर्ट्स, ४)पूर्वा इंगवले-ओम न्यू वर्तकनगर, ५)रोशनी माने, ६)तनुजा गोळे- दोन्ही रा.फ.नाईक, ७)आकांक्षा निचिते-किल्ले माऊली, ८)स्वप्नाली खंडागळे-गावदेवी मंडळ, ९)वैष्णवी साळुंखे-ज्ञानशक्ती युवा, १०)सानिया गायकवाड-श्री समर्थ मंडळ, ११)श्वेता केदारे-जय भारत मंडळ, १२)श्रेया गावडे-संकल्प मंडळ.
प्रशिक्षक :- संदीप शिकारे व्यवस्थापिका :- प्रतिमा महाडिक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!