क्रीडा व मनोरंजन

समर्थच्या वासंतिक क्रीडा शिबिराचा समारोप

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई : दादर (पश्चिम) येथील श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या ४८ व्या वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला. १४०० पेक्षा जास्त शिबिरार्थी या शिबिरात सहभागी झाले होते. समारोप सोहळ्यात शिबिरार्थींनी विविध प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांची आणि पाहुण्यांची दाद मिळविली. या खेळातील पहिली अर्जुन पुरस्कारप्राप्त हिमानी परब हिचा खास सत्कार समारोप सोहळ्यात करण्यात आला. यंदाच्या शिबिराची ती शिबिर प्रमुख होती. यंदा शिबिरात कोल्हापुर येथील कणेरी मठातील ६ विद्यार्थी, अंकुर प्रतिष्ठान या संस्थेतील १५ खास मुले सहभागी झाली होती. ‘जी’ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, रंगकर्मी डॉ. वामन केंद्रे, लिटिल चॅप स्वरा जोशी समारोप सोहळ्याला पाहुणे म्हणून उपस्थित होते.

उत्कृष्ट शिबिरार्थी
मुली – गीता कदम, मुग्धा पाटील, श्रृती सुब्रमण्यम, डिनेल अल्मेडा, स्वरा आंबेकर,

मुले आदि पाटील, पार्थक – पाटील, हर्ष कंठीकार, वेदांत विचारे, जॉय डिसोझा, अंशुल साहू, गौरांश घवाली,

उत्कृष्ट प्रशिक्षक सखाराम नाईक, सेजल वस्त, प्राप्ती महाडिक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!