आरोग्य व शिक्षण

खा.सुप्रियाताई सुळेंच्या पुढाकारातून 12 दिव्यांग जोडप्यांचा अनोखा विवाह सोहळा

Spread the love

आवाज न्यूज : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या वतीने व सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकारातून प्रथमच आयोजित केल्या गेलेल्या 12 दिव्यांग जोडप्यांच्या अनोख्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी धनंजय मुंडे , आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे व स्वतः सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर,यांसह मान्यवर उपस्थित होते.

स्वतः कोविड बाधित असूनही दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात लग्न सोहळा अनुभूती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सुप्रियाताई सुळे यांच्या कार्य व इच्छा शक्तीचे कुतूहल व आदर वाटतो, असे म्हणत धनंजय मुंडेसाहेब आणि राजेश टोपेसाहेब यांनी सुप्रियाताई यांना कोविड मधून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

सामाजिक न्याय मंत्री आमचे धनंजय मुंडे व आरोग्यमंत्री राजेश टोपे या दोघांच्या सहकार्याशिवाय हा लग्न सोहळा होऊच शकला नसता. हा सामुदायिक विवाह सोहळा हा केवळ एक टप्पा असून पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम राज्यभरात राबवायचे आहेत, यासाठी दोघा मंत्री महोदयांनी आपल्या विभागांमार्फत सहकार्य करावे अशी सूचना सुप्रिया सुळे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!