ताज्या घडामोडी

जवाहर बालभवन, इमारतीच्या नुतनीकरणाचा शुभारंभ 

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
बालभवन ही इमारत मुंबईमधील महत्त्वाच्या परिसरातील मरिन लाईन्स या ठिकाणी समुद्राच्या काठावर दिमाखात उभी आहे. या इमारतीचा कोनशिला दिनांक २४ मे १९५० रोजी भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शुभ हस्ते बसविण्यात आली. त्यानंतर दिनांक २४ फेब्रुवारी १९५२ रोजी बालभवनचा उद्घाटन समारंभ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या शुभ हस्ते पार पडला. तसेच दिनांक ०६ डिसेंबर १९५२ रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व मोरारजी देसाई यांनी बालभवनला भेट दिली आहे.

बालभवनमध्ये ४ ते १६ वयोगटातील मुलांसाठी संगित, नाटय, चित्रकला, शिल्पकला, तबला, अशा विविध छंदवर्गाचे आयोजन अत्यंत माफक शुल्कामध्ये वर्षभर करण्यात येते.

बालभवनच्या इमारतीस ७० वर्षे पूर्ण होत आहेत. सदरची इमारत जीर्ण झाली आहे. इमारतीस दुरुस्तीची आवश्यकता आहे. मुलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देऊन बालभवनच्या अध्यक्षा व शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड यांनी या ऐतिहासिक इमारतीच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला. या कामाचा शुभारंभ नुकताच मंत्री महोदयांच्या शुभहस्ते करण्यात आला.

बालभवनची इमारत ऐतिहासिक वास्तु असल्यामुळे तिचे जतन व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे नमूद करुन सदर वास्तु आंतरराष्ट्रीय दर्जाची केली पाहिजे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

बालभवनची इमारत मुंबईमधील अतिशय महत्त्वाच्या अशा मरिन लाईन्स ठिकणी आहे. भव्य अशी वास्तु आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. या वास्तुचे अशाप्रकारे नूतनीकरण करावे की लोकांना बघताक्षणी कळावे की ही बालभवनची इमारत आहे. यासाठी शिक्षण विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिका-यांनी एकत्रित बसून आपआपल्या संकल्पना मांडाव्यात व त्यानुसार पुढील कार्यवाहीची रुपरेषा आखून एक भव्य दिव्य अशी वास्तू निर्माण करावी अशी अपेक्षाही शिक्षण मंत्री महोदयांनी या प्रसंगी व्यक्त केली.

इमारत दुरुस्तीमध्ये संपूर्ण इमारतीचे मजबुतीकरण करणे, इमारतीचे आतील व बाहेरील बाजूने प्लास्टर करणे, नादुरुस्त दरवाजे खिडक्या बदलणे, स्वच्छतागृहाचे नुतनीकरण करणे, प्लंबिग व विद्युतीकरणाचे नुतनीकरण करणे व संपूर्ण इमारतीस रंग देणे इत्यादी कामाचा समावेश आहे.

जवाहर बालभवनच्या पहिल्या मजल्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्युझियम तयार करणे तसेच दुस-या मजल्यावर विविध छंद वर्गांकरीता स्वतंत्र कला दालने निर्माण करणे प्रस्तावित आहे. याकामाचा आराखडा तयार करण्याचे काम सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मधील आर्किटेक्चर विभागाकडून सुरु आहे.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी शालेय शिक्षण व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित होते. कैलास पगारे, राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान हांडे, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई विभागीय उपसंचालक संदिप संगवे उपस्थीत होते. बालभवनचे संचालक आर. एस. नाईकवाडी यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!