ताज्या घडामोडी

पेठ येथे ना.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रचिकित्सा शिबिर.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

पेठ (ता. वाळवा) येथे राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या मोफत् नेत्रचिकित्सा शिबीरातील रुग्णांना मोफत चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार मानसिंगभाऊ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, वाळवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजयबापू पाटील, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत पाटील, अतुल पाटील, बाजार समितीचे माजी सभापती विजय पाटील, शरद पाटील, बाजार समितीचे सभापती संदीप पाटील, विजय पाटील, संपत पाटील, सुधाकर पाटील, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष सुनिता देशमाने, राजारामबापू दूध संघाचे संचालक बंडोपंत नांगरे, नामदेव कदम, आत्मशक्ती समुहाचे हंबीरराव पाटील, हेमंत पाटील, डॉ. अभिराज पाटील, फिरोज ढगे, महेश जाधव, भागवत पाटील व सुभाष भांबुरे आदी मान्यवर, लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!