अध्यात्मिकआपला जिल्हासामाजिक

मावळ माहेश्वरी समाज महेश नवमी उत्सव रविवार दिनांक 28 मे रोजी उत्साहात संपन्न!

५० रक्तदात्यांनी रक्तदान करून या समारंभाची अतिशय अनुकरणीय सुरुवात झाली.

Spread the love

मावळ माहेश्वरी समाज महेश नवमी उत्सव रविवार दिनांक 28 मे रोजी उत्साहात संपन्न!Maval Maheshwari Samaj Mahesh Navami Utsav concluded with excitement on Sunday 28th May!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३० मै.

रक्तदान श्रेष्ठदान या जीवन तत्त्वानुसार पिंपरी चिंचवड ब्लड बँक संचलित युवराज बडगुजर यांच्या सहकार्यातून भंडारी हॉस्पिटल तळेगाव येथे- सर्वप्रथम जवळजवळ ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून या समारंभाची अतिशय अनुकरणीय सुरुवात झाली.

त्यानंतर अतिशय आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीतून- महेश भगवानच्या मोहक मूर्तीस विराजमान करून- राजस्थानी वेशभूषा धारण केलेल्या माहेश्वरी बंधू भगिनींच्या शोभायात्रेची सुरुवात भंडारी हॉस्पिटल पासून सुरू झाली. गजानन महाराज मंदिराला वळसा घालून डॉक्टर  विजया भंडारी नाना नानी पार्कजवळ या शोभायात्रेची सांगता झाली! गणेश वंदना महेश वंदना आणि स्वागत गीत झाल्यानंतर- प्रमुख अतिथी महेश बँकेचे चेअरमन  जुगल जी पुंगलिया आणि सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार संस्थेचे अध्यक्ष  उमेशजी भुतडा आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेत.

प्रोफेसर ज्ञानेश्वर  मंत्री यांनी प्रास्ताविक केले, ॲडवोकेट प्रवीण भुतडा यांनी प्रमुख अतिथी  जुगल जी पुंगलिया यांचा अतिशय मोजक्या शब्दात परिचय करून दिल्यानंतर  पुंगलियानी आपला जीवन प्रवास उपस्थिताना आपल्या मनोगतात व्यक्त करून अंतर्मुख केले.

अत्यंत उत्साही कार्यक्षम अध्यक्ष- उमेशजी भुतडा यांनी शेरोशायरी आणि दृष्टांत्वाद्वारे माहेश्वरी बांधवांना नवनवीन प्रकल्पासाठी ऊर्जा भरणार आपलं मनोगत व्यक्त केल! ज्येष्ठ लेखक- वक्ते डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी–” संघटन शक्ती आणि त्याची व्याप्ती”– या विषयावर उपस्थित बंधू-भगिनींना काव्यपंक्ती आणि शेरोशायरी द्वारा संबोधित केलं! महेश बँकेचे संचालक  अजय जी लड्डा यांनी महेश बँकेचे सभासदत्व आणि त्याचं महत्त्व या विषयावर आपलं भाष्य केलं!

विशेष अतिथी म्हणून- पूनि निवासी डॉक्टर द्वारकादाजी- डॉक्टर ईश्वर- डॉक्टर दिपाली झवर- डॉक्टर संजय मानधने- श्रीमान पांडूलालजी सोनी-  अजयजी लड्डा अशा अनेक मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला! चित्रकला आणि नृत्य कलेच्या माध्यमातून माहेश्वरी नव युवतींना आपली कला सादर करण्यास हक्काच एक उत्तम असं व्यासपीठ उपलब्ध करण्यात आलं. सुषमा जाजू यांच्या अतिशय समर्पक सूत्रसंचालनाने समारंभाची उंची वाढत गेली.

मावळ माहेश्वरी समाजाने आयोजित केलेल्या या महेश नवमी समारंभास- देहूरोड- तळेगाव वडगाव -कामशेत लोणावळा आणि कालेकॉलनी येथील सर्व माहेश्वरी बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते! हा अतिशय देखणा- प्रसन्न आणि पवित्र समारंभ यशस्वी करण्यास- अध्यक्ष उमेशजी भुतडा उपाध्यक्ष राधेश्याम भंडारी सचिव चंद्रशेखर जाजू प्रकल्प अधिकारी अभिजीत दागडिया खजिनदार राजगोपाल मुंदडा तसेच- ॲडवोकेट प्रवीणजी भुतडा अमित सारडा पूजा सिंगी- संध्या भट्टड- विकास काबरा- संदीपजी भुतडा- सुरज भराडिया सुरेश भराडिया, जितेंद्र या सर्व मंडळाच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. भजन- आरती आणि सुग्रास महाप्रसादाने या महेश नवमीच्या समारंभाची सांगता झाली! समारंभातून निरोप घेणाऱ्या प्रत्येक माहेश्वरी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर विलक्षण उत्साह- आनंद आणि कर्तव्यपूर्तीच्या समाधानाची अनुभूती हीच समारंभाच्या यशस्वीतेची खरी पावती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!