ताज्या घडामोडी

सांगली येथील वेध डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर च्या संचालिका डाॅ.जयश्री पाटील यांची बाल न्याय मंडळ सदस्या म्हणून निवड

Spread the love

सांगली येथील वेध डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर च्या संचालिका कविभूषण डाॅ.सौ.जयश्री श्रेणिक पाटील MBBS DMRE FFIM एक्स रे,सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय तज्ञ यांची *सांगली जिल्हा बाल न्याय मंडळ सदस्या म्हणून निवड* झाली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 

18 वर्षाखालील बालअपचारीचे सर्व न्यायालयीन कामकाज बाल न्याय मंडळपुढे चालते. त्रिसदस्यीय बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष हे प्रथम वर्ग न्यायाधीश असतात व दोन सामाजिक कार्यकर्ते सदस्य असतात.
डॉ.जयश्री पाटील या सामाजिक कार्यकर्त्या, प्रभावी वक्त्या, सृजनशील कवयित्री, जात्यावरील ओव्या, उखाणे, पाळण्याची लेखिका ,चित्रकार,संगीतकार,
अभिनेत्री, सुगरण ,चार आंतरराष्ट्रीय. (लंडन,अमेरिका) आणि 55 राज्यपुरस्काराच्या मानकरी आहेत.तसेच
दहा ते बारा शासकीय समितीच्या सदस्यlही आहेत.
तसेच विविध विषयावरील प्रबोधनपर व्याख्यानाच्या माध्यमातून तळागाळातील समाज मनापर्यंत पोहचून विधायक विचारांची पेरणी करून आत्तापर्यंत त्या यशस्वी झालेल्या आहेत .डॉ जयश्री पाटील लिखित पुस्तक
‘स्त्रीशक्तीची उत्तुंग भरारी तरीही स्त्रीभ्रूणहत्या का? या विषयावरील व्याख्यान आणि पुस्तकाच्या माध्यमातून समाजासाठी भरीव कार्य त्यांनी केलेले आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आज सांगली जिल्ह्याची स्त्री आणि पुरुष लोकसंख्या आकडेवारी ही बरोबरीने झालेली दिसत आहे. *डॉ जयश्री यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्या हस्ते नुकताच मेडिक्विन एक्सलन्स पुरस्कार* देऊन त्यांचा राजभवन मुंबई इथे सन्मान झालेला आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या *जागतिक सौंदर्य स्पर्धेमध्ये मिसेस दिवा वर्ल्ड वाईड विक्विन हेरिटेज ब्युटी* या टायटल च्या डॉ्.जयश्री विजेत्या ठरलेल्या आहेत आणि पद्मश्री चंद्रकांत संभाजी पांडव यांच्या हस्ते त्यांना हा मुकुट प्रदान करण्यात आलेला आहे.
डॉ् जयश्री श्रेणिक पाटील या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या पश्‍चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा आहेत आणि 18 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद ही त्यांनी भूषविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!