क्रीडा व मनोरंजन

राष्ट्रीय मिनी सबज्युनिअर टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र चार गटात तर गुजरात दोन गटात सुवर्णपदक

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

नाशिक दि . ११ मे: नाशिक  जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन, अखिल भारतीय मराठा महासंघ आणि अस्मिता महिला मंडळयांच्या संयुक्त विद्यमाने आणि टेनिसव्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल येथील इनडोअर हॉल मध्ये २३ व्या राष्ट्रीय टेनिसव्हॉलिबॉल अजिंक्यपद  स्पर्धेचेआयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची मोठ्या उत्साहात सांगता झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानी सहापैकी चार गटात विजेतेपदमिळवून चौहेरी यश संपादन केले. तर दोन गटात उपविजेतेपद मिळविले. या स्पर्धेत मिनी गटात महाराष्ट्र संघाने अंतिम लढतीत गुजराथ संघावर २-० असा विजय मिळवून विजेतेपद पटकावले. तर सब ज्युनिअर गटातही अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने गुजरात चा २-१ असा पराभव करून या गटाचेही विजेतेपद पटकावले.मिनी गटाच्या मिश्र दुहेरी या प्रकारात महाराष्ट्राच्या जोडीने तेलंगणचा पराभव करूनविजेतेपद मिळविले. तर सब ज्यूनियर मिश्र दुहेरी मध्येही महाराष्ट्राच्या जोडीने अंतिम लढतीत आंध्र प्रदेशवर मात करून या गटाचे विजेतेपद मिळविले. गुजराथ संघाने मिनी मुली आणि सब ज्यूनियर मुलीं या दोन गटाचे विजेतपद मिळविले.

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे आ. अँड.राहुल ढिकले, नाशिकच्या विभागाच्या क्रीडा उपसंचालक सौ.सुनंदा पाटील, नगरसेवक रुची कुंभारकर, या खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड,मराठा महासंघ,नाशिकचे अध्यक्ष अशोक कदम, सचिव दिपक पाटील, टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशनऑफ इंडियाचे अध्यक्ष आनंद खरे, टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव गणेश माळवे,फेडरेशनचे खजिनदार धर्मेंद्र सिंग जाडेजा,नर्सिम्मा सहसचिव मुकेश बाथम, कर्नाटकचे सचिव नागेश्वरराव,डॉ. दिनेश शिगारम, रामेश्वर कोरडे ,अशिष ओबेरॉय आणि सर्व राज्यांचे सचिव उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहा गटाच्या विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक आनंद खरे यांनी केलेयावेळी बोलतांना आ. राहुल ढिकले यांनी सांगितले की, खेळाडूनी मेहनत करून आपल्या राज्याचे आणि देशाचे नांव उंचवावे. खेळाडूंच्या प्रगतीसाठी आमच्याकडून सर्व प्रकारचे सहकार्य दिले जात आहे असे सांगून खेळाडूंचे अभिनंदन केले.तर नाशिक क्रीडा उपसंचालक सौ. सुनंदा पाटील यांनी या भारतीय खेळाला शासनाच्या वतीने कायमच सहकार्य मिळेल असे सांगीतले.

यावेळी या खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी या खेळाच्या२३ वर्षाच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. या स्पर्धेची तांत्रिक बाजू पंच मंडळाचे प्रमुख प्रफुलकुमार बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली किरण घोलप, अक्षय गामणे, गणेश पाटील,  एस. प्रसंगी, सिद्धांत लिपणे, राहुल पेटकर, उमेश सेनभक्त, निलेश माळवे, गणेश कलंगूल, बंडू जमदडे, अभिषेक सोनवणे, तृषाली बरिया, नवाखाईपटेल आदिनी जबाबदारी सांभाळली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिपक निकम, बाळासाहेब गुरव, प्राजंल उगले, सपना गरगटे, डिपंल सोनार, प्रवीण किंगरे, जयंत चिखले, संहिल जोगदंड, पराग सोनवणे आदिनी परिश्रम घेतले.  २३ व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपदपटकावणाऱ्य महाराष्ट्राच्या खेळाडूसोबत प्रमुख पाहुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!