ताज्या घडामोडी

सांगवी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

Spread the love

ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने गजबजला परिसर

अक्कलकोट दि.१५
साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा, याप्रमाणे सांगवी गावाला अनेक साधू संतांचे आगमन झाल्याने गावामध्ये ईश्वरनामाने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्री हनुमान देवस्थान मंदिरात या सप्ताह आयोजित केला होता. सप्ताह श्री गुरुवर्य अप्पासाहेब वासकर महाराज फडा तर्फे गुरुवर्य राणा महाराज वासकर यांचे कृपाशीर्वादाने श्री नृसिंह जयंती निमित्त आयोजित सात दिवसांच्या सप्ताहाची आज मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.
या सात दिवसाच्या सप्ताह मध्ये दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण वाचन, दुपारी गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, सायंकाळी प्रवचन , रात्री कीर्तन व हरिजागर असा दिनचर्येत सात दिवस संपूर्ण सांगवी दुमदुमली व तसेच या दरम्यान, दररोज सकाळी अल्पोपहार , दुपारचे जेवण, सायंकाळी चे जेवणाची व्यवस्था गावातील नागरिकांनी केली होती.
आज दि. १५ रोजी या सात दिवसाच्या सप्ताह ची सांगता सकाळी पालखी सोहळ्याची दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली असून, दरम्यान या दिंडी प्रदक्षिणा नंतर ह भ प बन्सीलाल भोसले महाराज यांच्या सुश्राव्य असे काल्याचे कीर्तन झाले. व काला फोडून पंचारती करण्यात आली. गावामध्ये संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून, तोरणे पताक्यांनी, रांगोळी घालून संपूर्ण गाव सजवून जणू गावामध्ये विट्ठल नगरी पंढरपूर अवतरल्याचे सर्वत्र चित्र निर्माण झाले होते.
या सप्ताहच्या शेवटी कै गंगाधर बलभीम भोसले यांच्या स्मरणार्थ अनिल गंगाधर भोसले यांच्या कडून संपूर्ण गावकरी व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या सात दिवसाच्या सप्ताह ला समिती अध्यक्ष अंकुश घाटगे, उपाध्यक्ष राजू भोसले, व्यवस्थापक विष्णू रेड्डी, परशु रेड्डी, लाईट व्यवस्था प्रताप भोसले, यातीराज भोसले, नियोजन टीम बन्सीलाल भोसले महाराज, महेश भोसले महाराज, गोपीनाथ माने, विनोद कोळी, बाजीराव माने, लक्ष्मण यादव , निवृत्ती रेड्डी, काशिनाथ रेड्डी, कृष्णात भोसले, शुभम जाधव, दत्तात्रेय वाघमारे, राम आवटे, रोहित घाटगे, राहुल भोसले, ओम घाटगे , बळवंत भोसले, संग्राम घाटगे, अक्षय जाधव, मनोज भोसले, गणेश भोसले, व श्री शिवछत्रपती तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच परगावाहून आलेले मृदगाचार्य गोविंद चव्हाण, मोहन चव्हाण, तुकाराम जाधव, महाराज, हरिपाठ भजन चालक किसन मोरे महाराज, व्यासपीठ चालक सुभाष जाधव महाराज, यांचे मार्गदर्शन लाभले.
या सप्ताह सांगत्याला गावातील सरपंच वर्षा भोसले, पोलीस पाटील शुभांगी बाबर, उपसरपंच लक्ष्मण डांगे, माजी उपसरपंच अबूबकर शेख, विद्वान रेड्डी, विष्णू भोसले, मेजर बाळासाहेब भोसले, प्रदीप सलबत्ते, मेजर बालाजी रेड्डी, प्रवीण घाटगे, मेजर राजू रेड्डी, सुभाष रेड्डी, सत्पाल भोसले, किसन भोसले , कोंडीबा जाधव, गणेश मोरे, दिगंबर घाटगे, सुभाष देवकर, बाळू जाधव, यांच्यासह गावातील भाविक भक्त उपस्थित होते.

◼️ *दररोज सकाळी अल्पोपहार देणाऱ्या ची नावे*:-
१) तुकाराम रखमाजी जाधव
२) दत्तात्रय कोंडीबा ढेंगले
३) अप्पाराव तिपन्ना कोळी
४) नंदकुमार शामराव घाटगे
५) प्रभाकर तुकाराम यादव
६) प्रकाश रामचंद्र देवकर
——————————————-
◼️ *दुपारचे अन्नदाते*

१) मारुती नारायण जाधव
२) लिंबाजी चंद्रकांत रेड्डी,

४) सत्पाल सदाशिव भोसले
५) नामदेव बाजीराव माने
६) सत्पाल सदाशिव भोसले
——————————————-
◼️ *सायंकाळचे अन्नदाते*

१) मोहन तुकाराम माने
२) अप्पाराव तानाजी देवकर
३) रघुनाथ बळवंत भोसले
४) दादासाहेब डिगंबर भोसले
५) बाळाप्पा भिमराव बिराजदार
६) मारुती एकनाथ भोसले

*या सर्व अल्पोपहार, अन्नदात्यांचे, संतचरण रज समस्त ग्रामस्थ सांगवी बु यांच्या वतीने आभार*
—————————————————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!