ताज्या घडामोडी

बोईसर मध्ये सॅटॅलाइट सर्विस विकचे शानदार उद्घाटन, 27 लाखांचे लायन्स क्लबचे विविध उपक्रम

Spread the love

पालघर प्रतिनिधी ता.2
समाजातील तळागाळातील गरजू व्यक्तींची गरज लक्षात घेऊन लायन्स क्लब तर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू देऊन त्यांना आधार दिला जातो असे लायन्स क्लब चे डिस्ट्रिक गव्हर्नर डॉ. ख्वाजा मुदतस्सर यांनी सांगितले.

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्स डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री वन च्या सॅटॅलाइट सर्विस वीक चे शानदार उद्घाटन बोईसर येथील डॉ. स. दा. वर्तक विद्यालयाच्या प्रांगणात झाले. यावेळी बोलतांना डिस्ट्रिक गव्हर्नर डॉक्टर मुदतस्सर यांनी सॅटॅलाइट सर्विस विक मध्ये 108 क्लब सहभागी झाले असून सुमारे 27 लाख निधी या सर्विस विकसाठी खर्च केला जात आहे. यासाठी अनेक दात्यांचे आणि क्लबचे मोठे योगदान लाभले आहे असे सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीएसटी चेअरपर्सन मनोज बाबुर यांनी करतांना सांगितले की, समाजातील गरजू लोकांना चादर,ब्लॅंकेट,चटई, जीवनावश्यक रेशन, सायकल, ट्राय सायकल, शिलाई मशीन आणि अपंगांना व्हीलचेअर आदी वस्तू यासाठी लाईट सर्विस वीकमध्ये देण्यात येणार आहेत. तसेच काही कायमचे उपक्रम जसे टॉयलेट ब्लॉक, बोअरवेल, ग्रंथालय, शाळांना शैक्षणिक साहित्य आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
या सॅटॅलाइट सर्विस विक चे उद्घाटन माजी डिस्ट्रिक गव्हर्नर उमेश गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलतांना गांधी यांनी जीवनात कर्म अत्यंत महत्त्वाचे असून समाजातील गरजू लोकांपर्यंत आपली सेवा पोहोचली पाहिजे असे आवाहन केले.

या वेळी डिस्ट्रिक सॅटेलाईट कॉर्डिनेटर अंजली मिस्त्री, व्हॉइस डिस्टिक गव्हर्नर हेमंत राज सेठीया, अजय हवेलीया, तारापूर लायन्स क्लबचे अध्यक्ष करवीर, डिस्ट्रिक सेक्रेटरी, खजिनदार तसेच पदाधिकारी आणि वेगवेगळ्या क्लबचे पदाधिकारी आणि गरजू लाभार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सूर्यकांत संखे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश वंदन आणि कोळी नृत्य आणि सर्वांना मंत्रमुक्त केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवछत्रपती महाराज यांच्या व सेनापतींच्या वेशामध्ये घोड्यावरून काढलेली फेरी अत्यंत आकर्षक वाटत होते.या सोहळ्याची रूपरेषा लायन नीलिमा पाठक यांनी तयार केली होती .लायन विजय पाठक यांनी या सोहळ्याचे नियोजन करण्यास मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!