आरोग्य व शिक्षण

कार्ल्याच्या श्री एकविरा गड व पायथा परिसरात मार्गशिष आमावस्या व रविवारनिमित्त प्रचंड गर्दी

Spread the love

लोणावळा : कार्लाच्या श्री एकविरा गड व पायथा परिसरात मार्गशिष आमावस्या व रविवारनिमित्त कोळीबांधव व राज्यातील भाविक भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती. वेहेरगाव ते कार्लाफाटा तसेच गडावर वाहनतळावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी पाहून मंदिर उघडे ठेवावे , की बंद याबाबत शासनाचे कोणतेही आदेश नसल्याने श्री एकविरा देवी मंदिर दर्शनास सुरू असल्याने आज भाविक आपल्या कुटूंबातील सदस्य व मिञमंडळीला घेवून कार्लाला आले होते.कार्लाच्या श्री एकविरा देवीचे मंदिरात शनिवार , व नववर्षाचे निमित्ताने कालही प्रचंड गर्दी भाविक भक्तांची आढळून आल्याचे एका खाणावळ चालकाने आवाज न्यूज शी बोलताना सांगितले .आजही भाविक भक्तांची मोठी गर्दी दिसून आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!