ताज्या घडामोडी

कोकण विभाग-शाखा तालुका रत्नागिरी शाखेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात भेदीक शाहीरी आणि जाखडी नृत्यांच्या मनोरंजक कार्यक्रमांनी समस्त रसिकजन मंत्रमुग्ध

Spread the love

भेदीक शाहीरी,जाखडी नृत्यांनी शाहीर परिषद रंगली

रत्नागिरी तालुक्यातील अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद (मुंबई रजि.) ,कोकण विभाग-शाखा तालुका रत्नागिरी या शाखेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात भेदीक शाहीरी आणि जाखडी नृत्यांच्या मनोरंजक कार्यक्रमांनी समस्त रसिकजन मंत्रमुग्ध झाले.
हा कार्यक्रम नमन लोककला संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रविंद्रजी मटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी पंचायत समिती सभापती महोदय संजना माने यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला कोकण उपविभागिय अध्यक्ष शिंदे गुरुजी,जिल्हाध्यक्ष श्रीधर कदम, जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जाधव,साधना साळवी,पंचायत समिती सदस्य अभयजी खेडेकर,मेघना पाष्टे, पत्रकार शाहिद खेरटकर, कोमसाप जिल्हा युवाध्यक्ष अरुणजी मौर्ये, कळझोंडी ग्राम.सरपंच दिप्ती वीर,उपसरपंच प्रकाश पवार, सांडेलावगण ग्राम. सरपंच दर्शना बेनेरे, भगवतीनगर ग्राम.उपसरपंच लक्ष्मण आग्रे, सामाजिक कार्यकर्ते राजूशेठ साळवी,भाई कोळंबेकर,तालुकाध्यक्ष झराजी वीर,उपाध्यक्ष सुरेश घाणेकर,लांजाहून शाहीर मधूकर पंदेरे,तुषार पंदेरे, चिपळूणहून शाहीर सचिन धुमक,चंद्रकांत साळवी, नाट्य दिग्दर्शक दत्ता वीर, ढोलकी सम्राट अनिल गावडे, सुरेश वीर तसेच पंचक्रोशीतील लोककलावंत, ग्रामस्त उपस्थित होते.
तसेच संस्थेच्या सर्व सदस्यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले. सुभाष चौघुले,चंद्रकांत मालप,यशवंत निंबरे,बाळकृष्ण नेवरेकर, गणपत वीर,सहदेव वीर,अशोक गोताड,शांताराम वीर आदि सभासदांनी विशेष मेहनत घेतली. सुत्रसंचालन शाखेचे सचिव संदेश पालये यांनी केले.एकूणच हा लोककलावंतांचा मेळावा कलावंतांसहीत प्रेक्षकांनाही ऊर्जादायी ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!