महाराष्ट्र

समाजात हपापलेल्या नेत्यां पेक्षा,झपाटलेले नेते जेंव्हा पैदा होतील…तेंव्हाच कुठे समाजाचा नेत्यांवर विश्वास बसेल..

Spread the love

रोख ठोक
अशोक पातोंड धनगर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कॉलनी अकोट जिल्हा अकोला

राज्यातील सर्व पक्षीय धनगर नेते एका सतरंजीवर किंवा व्यासपीठ वर येतांना मी तरी बघितले नाही किंवा मला तरी वाटत नाही की,कोणी समाज एकत्र येण्या साठी प्रामाणिक प्रयत्न केला असेल.प्रत्येक नेता मग तो कुठल्याही पक्षाचा का असेना…नेतृत्व,वर्चस्व आणि स्वतःचे अस्थित्व दाखविण्या साठी….मी तर म्हणेल पक्षाच्या “गॉड फादर”ला अधिक खुश ठेवण्या साठीच समाजाचा वापर करीत असतो.थोडक्यात कुठल्याही नेत्याला”पक्षीय हित” हे”समाज हिता”पेक्षा अधिक महत्वाचे वाटतो.त्यांनी काय समाजा पेक्षा,पक्षा साठीच जन्म घेतला की काय असे मला तरी वाटायला लागले.कारण आज पर्यन्त कुठल्याही समाज नेत्यांने राज्यातील सर्व पक्षीय धनगर नेते एकत्र येण्या साठी कधीच प्रयत्न केले नाहीत.उलट समाजात आपले स्वार्थाचे राजकारण करण्या साठी गट तट पाडून राजकारण केल्याचे आपण सर्वांनीच बघितले.
बांधवांनो खरे सांगायचे म्हणजे समाज नेत्यांनाच मुळात एकत्र येण्याची ऍलर्जी असून खरोखरच या लोकांना एकत्र यायचे असते तर “आरक्षण”सारखा प्रश्न जेंव्हा जेंव्हा ऐरणीवर येतोय,त्या त्या वेळी नेते कधीच एकत्र येतांना दिसले नाहीत.उलट त्यांनी “आरक्षण”सारख्या आंदोलनात सहभागी न होता वेगळे वेगळे आंदोलन उभारून किंवा आपली वेगळी चूल मांडून आम्ही अजूनही मेंढरच असल्याचे समाजालाच नाही तर राज्यकर्त्यांना सुद्धा दाखवून दिले.परिणामी “आरक्षण”सारखा मूळ प्रश्न धूळ खात पडला.
बांधवांनो मला आपणास संगायचे आहे की,घटनेने आपल्याला “आरक्षण”दिल्या वरही जर आपली समाज नेते एकत्र येत नसतील तर राज्यकर्त्यांचे फावल्या शिवाय राहत नाही किंवा त्यांचा राजकीय मार्ग सुकर झाल्या शिवाय राहत नाही.धनगरांना कुठल्याही परिस्थितीत”आरक्षणच”काय तर राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कुठलेच फायदे मिळू नयेत…म्हणून राज्यकर्त्यांचा डाव चाललेला असून वेळीच समाजाने सुधारणे किंवा जागृत होणे काळाची गरज आहे.
बांधवांनो समाजाचा कुठलाही प्रश्न असू द्या.आपली समाज नेते कधीच एकत्र न येता उलट पक्ष व “गॉड फादर”च्या इशाऱ्या वरून समाजाला नाचविण्याचे प्रयत्न करताना आपण कित्येक वर्षा पासून अनुभले आहे.परिणामी आपण आपल्या हक्कां पासून वंचित झालोय.असे माझे स्पष्ट मत आहे.
गेल्या 70 वर्षात काय झाले त्या पेक्षा भविष्यात काय करायचे,या साठी तरी निदान समाज नेत्यांनी एकत्र येऊन पावले उचलणे गरजेचे आहे.किंवा एकत्र आणण्या साठी राज्यात या पुढे तरी एखाद्या धनगर नेत्याने जन्म घेणे गरजेचे आहे.
सर्वात महत्वाचे सांगायचे झाल्यास समाज नेत्यांनी मग ते कुठल्याही पक्षाचे असोत “सामाजिक हित”जेथे असेल निदान तिथे तरी एकत्र येऊन सामाजिक प्रश्न हाताळणे महत्वाचे आहे.
माझी या द्वारे सर्व समाज नेत्यांना हात जोडून विनंती असेल की,”पक्ष हीत”बाजूला सारून “समाज हिताला”अधिक प्राधान्य देणे गरजेचे आहे.त्या साठी एखाद्या तरी समाज नेत्यांनी पुढाकार घेऊन राज्यातील सर्व समाज नेते एकाच व्यासपीठ किंवा सतरंजी वर कसे येतील,या साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.यातच समाजाचे भले असेल.अन्यथा या पुढील काळात समाज कुठचाच शिल्लक राहणार नाही…आणि म्हणून माझी सर्व पक्षीय समाज नेत्यांना एकच विनंती की,सर्व प्रथम आपण एकत्र आले पाहिजे.समाज आपोआप एकत्र आल्या शिवाय राहणार नाही.
चुकलं तर माफ करा.
धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!