ताज्या घडामोडी

वाटद गावचे सुपुत्र सोनूजी जाधव यांची २० रोजी शोकसभा

Spread the love

जलसा व नाट्य कलाकार हरपल
जाकादेवी/वार्ताहर:- रत्नागिरी तालुक्यातील वाटद-मिरवणे गावचे माजी उपसरपंच, प्रसिद्ध नाट्य व जलसा कलाकार तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व आणि बौद्धजन पंचायत समिती वाटद शाखेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सोनूजी भागुराव जाधव (७२) यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांच्या निधनानिमित्त शुक्रवार दि. २० रोजी सकाळी ११ वा‌. त्यांच्या वाटद या निवासस्थानी जलदान व शोकसभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिवंगत सोनूजी भागुराम जाधव हे अत्यंत प्रेमळ, सुस्वभावी आणि कलाप्रेमी सज्जन व्यक्तिमत्व होते. त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तळमळीने काम केले.सुरुवातीची काही वर्षे त्यांनी मुंबई येथे नोकरी केली.त्यानंतर ते गावी स्थायिक झाले.गावात शेती व अन्य व्यवसाय कष्टातून उभारून आपला उदरनिर्वाह करून चांगल्या प्रकारे त्यांनी कुटुंब उभारले. त्यांच्या निधनाबद्दल वाटद-मिरवणे पंचक्रोशीतून दुःख व्यक्त केले जात आहे.दिवंगत सोनूजी जाधव हे ग्रामसेवक संदीप जाधव यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे, पुतणे,भावजय, असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!