ताज्या घडामोडी

वाढते पेट्रोल,डिझेल,गॅस सिलेंडर व रासायनिक खतांचे दर व महागाई विरोधात वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसने इस्लामपूर येथील ऐतिहासिक कचेरी चौकात एल्गार

Spread the love

इस्लामपूर दि.२१ प्रतिनिधी
वाढते पेट्रोल,डिझेल,गॅस सिलेंडर व रासायनिक खतांचे दर व महागाई विरोधात वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसने इस्लामपूर येथील ऐतिहासिक कचेरी चौकात एल्गार पुकारला. युवा कार्यकर्त्यांनी भाजपा केंद्र सरकार व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख यांनी निषेध मोर्च्याचे नेतृत्व केले. प्रारंभी राष्ट्रवादी भवनपासून मोर्च्याने येवून छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
संग्राम जाधव (आष्टा) म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन करीत आहोत. भाजपा केंद्र शासन व देशाचे पंतप्रधान देशातील जनतेला दिलेली आश्वासने विसरले असून त्यांना त्या आश्वास नांची आठवण करून देण्यासाठी हा भोंगा लावला आहे.
देवराज देशमुख (बोरगाव) म्हणाले, पंत प्रधानांनी देशातील जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखविली. मात्र अच्छे दिन हा आज चेष्टेचा विषय बनला आहे. त्यांनी देशातील जनतेची फसवणूक केल्याने देशातील जनतेत मोठा असंतोष निर्माण झाला आहे. काही लोक भोंगा,हनुमान चालीसावरून समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजू पहात आहेत. मात्र धर्मांचा जयघोष करीत सरकार चालविणाऱ्या श्रीलंका देशाची काय अवस्था झाली आहे,ते पहावे.
आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले यांनी अभिनेत्री केतकी पवारला समर्थन दिल्या बद्दल माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले,केतकीचे कृत्य लाजिरवाणे असून त्याच्यावर पांघरून घालणाऱ्या कोंबडी चोराची पोलिसांनी चौकशी करावी आणि सर्व सामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
महेश पाटील (तुजारपूर) यांनी रासायनिक खतांचे दर भरमसाठ वाढले असून शेतकऱ्यां नी शेती कशी करायची? असा सवाल केला. प्रमोद खोत बहादुरवाडी यांनीही केंद्र सरकार वर जोरदार तोफ डागली. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या छाया पाटील,सुनीता देशमाने,सुवर्णा जाधव,मंजुश्री पाटील यांनी समर्थन केले.
प्रारंभी उपाध्यक्ष संदीप पाटील (कामेरी) यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपसरपंच माणिक पाटील (तुंग), विनायक यादव (बनेवाडी),आसिफ पटेल (कुंडलवाडी), अजित बेनाडे (बहादुरवाडी),शुभम पाटील (नेर्ले),बजरंग सुर्यवंशी (तुंग),विश्वास कदम (मसुचीवाडी)विक्रम पाटील (कोरेगाव),प्रशांत थोरात (बहे),अभिजित पाटील (मर्दवाडी) यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रविण पाटील (कापुसखेड) यांनी आभार मानले.

युवा पिढीचे अनोखे आंदोलन।।
यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या टेप लावण्यात आल्या. त्यामध्ये ते जनतेला पेट्रोल,डिझेलचे दर कमी झाले,का नाही झाले? महागाई कमी झाली, का नाही झाली? तुमच्या खिशात चार पैसे राहिले,का नाही राहिले? आदी प्रश्न विचारत आहेत. त्या प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांनी नाही झाले,नाही झाले असे उत्तर देत इंधन दरवाढ व महागाईचा अनोखा निषेध केला..इस्लामपूर येथे वाढते पेट्रोल, डिझेल,गॅस सिलेंडर,रासायनिक खतांचे दर व महागाई विरोधात एल्गार पुकारताना तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख,माणिक पाटील,शिवाजी चोरमुले,महेश पाटील,आसिफ पटेल,विनायक यादव,अजित बेनाडे,प्रविण पाटील,शुभम पाटील,प्रमोद खोत व वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!