आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून सभासदांना दहा टक्के लाभांश घोषित करण्यात आला.

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून सभासदांना दहा टक्के लाभांश घोषित करण्यात आला. या निर्णयाबद्दल सभासदांनी आनंद व्यक्त केला.

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, 23 ऑगष्ट.

पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि 22 ) उपमुख्य अधिकारी सुप्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, सचिव रोहित भोसले, खजिनदार प्रवीण माने, उपाध्यक्ष वैशाली आडकर, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र काळोखे, सह संचालक व सभासद उपस्थित होते.

यावेळी सभासदांच्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास त्यासाठी 11 हजार रुपयाचा मयत निधी मंजूर करण्यात आला. तसेच सभासदाच्या मागणीनुसार कर्ज मर्यादा व सभासद वर्गणी मध्ये वाढ करण्यात आली. यावर्षी पतसंस्थेत ऑडिट वर्ग नेहमीप्रमाणे ‘अ’ वर्ग प्राप्त झाला आहे. त्यामुळे कार्यकारणीचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी स्वागत मुरलीधर टकले यांनी केले. सूत्रसंचलन रोहित भोसले तर आभार प्रवीण माने यांनी मानले. या सभेच्या नियोजनासाठी आशिष दर्शले, प्रवीण शिंदे, अश्विनी गरुड, मयूर डिलोर, अर्चना काळे आदींनी सहकार्य केले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!