आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक वडापाव दिन साजरा करत असताना वडापाव खाऊन दिवस काढणाऱ्यांचा विसर पडू देवू नका.

  तोंडाला कायम हवाहवासा  वाटणारा .. महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये वडापाव हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. त्या अनुषंगाने देश आणि विदेशांमध्ये देखील वडापाव बनविणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी देखील आपली विशेष अशी ओळख निर्माण केलेली आहे.

Spread the love

जागतिक वडापाव दिन साजरा करत असताना वडापाव खाऊन दिवस काढणाऱ्यांचा विसर पडू देवू नका. 
आवाज न्यूज: 23 ऑगष्ट

  तोंडाला कायम हवाहवासा  वाटणारा .. महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये वडापाव हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. त्या अनुषंगाने देश आणि विदेशांमध्ये देखील वडापाव बनविणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी देखील आपली विशेष अशी ओळख निर्माण केलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये देखील सर्वसामान्य माणसाला परवडणारा त्यातल्या त्यात आवडणारा पदार्थ म्हणजे वडापाव हा होय.!!

बऱ्याच वेळा पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा महानगरांमध्ये कामाच्या निमित्ताने फिरणारे तरुण वडापाव खाऊन आपला दिवस देखील काढत असतात.! त्यामुळे आज जागतिक वडापाव दिनाच्या निमित्ताने वडापाव विषयी आपल्या देखील काही आठवणी नक्कीच आपण जपलेल्या असतील यात काडीमात्र शंका नाही ? असे जरी असले तरी वडापाव हा असा पदार्थ आहे. की हा सर्वांना खाण्यासाठी हवाहवासा वाटत असतो. बऱ्याच वेळा वडापाव हा वडापाव चाहत्यांच्या खिशाला देखील परवडणारा असतो.!! त्यामुळे आपण देखील कधीत आपल्या मित्रांसोबत मैत्रीण सोबत चौकात टपरीवर गल्लीत कॉलनी त वडापाव नक्कीच खाल्लेला असणार.

त्यामुळे वडापाव विषयी आपल्या देखील काही आठवणी या आपण आज जाग्या करूयात .!! वडापाव हा फार मोठ्या प्रमाणे विक्री होणारा खाद्यपदार्थ आहे. वडापाव हा पदार्थ तेलामध्ये तळला जात असतो. त्यातल्या त्यात गरमागरम वडे आणि पाव यांची लागणारी चटकदार चव ही जिभेवर आपल्या देखील रेंगाळत असणार.!! महाराष्ट्र राज्यामध्ये देखील वडापाव विक्री करणाऱ्या काही व्यक्तींनी आपली वडापाव विक्रीच्या व्यवसायातून वेगळी ओळख देखील निर्माण केलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या संगमनेर तालुक्यातील समनापुर या गावांमध्ये एक चाचा की ज्यांनी आपल्या वडापाव व्यवसायाची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे .! अजून पुढे जाऊन आपल्याला सांगायची झाले तर संगमनेर तालुक्यातील समनापुर या गावाची ओळख देखील वडापाव आणि त्या वडापाव विक्री करणारा चाचा यांच्यामुळे निर्माण झालेली आहे. त्यामुळे वडापाव हा तोंडाला अगदी चटकदार असणारा पदार्थ हा फार मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढविणारा देखील आहे.

वडापाव दिनानिमित्त आपण वडापाव या एका पदार्थाविषयी चर्चा करणार आहोत.

चटकदार वडापाव विषयी आपल्या काही आठवणी ?

महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई या महानगरामध्ये आपण गेला असाल तर या महानगरामध्ये प्रत्येक गल्लीबोळात प्रत्येक चौकात रस्त्यांवर वडापाव विक्री करणारे दुकाने आणि विक्रेते आपल्याला दिसतील ! या व्यवसायाच्या अंतर्गत फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल देखील होत असते. अशाच पद्धतीचं वडापाव विक्री व्यवसायातून मोठं नावलौकिक मिळविलेले अहमदनगर शहरातील सोपानराव वडेवाले हे नाव एका गोष्टीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरात चर्चेत राहत असत!! त्यामागे गोष्ट देखील तशाच पद्धतीची एक आहे. सोपानराव वडेवाले यांच्या वडेच्या विक्री मधून फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक ऊलाढाल होत असल्याचा संशय इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला लागलेला होता त्यामळे इन्कम टॅक्स
डिपार्टमेंटने अहमदनगर शहरातील सोपानराव वडेवाले यांच्या वडापावच्या दुकानावर टाकलेली रेड ही सर्वांना परिचित आहे. या दुकानावर वडापाव किती विकले जातात याची छाननी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने त्या दुकानासमोर पडत असलेल्या कागदांवरून अंदाज लावलेला होता. आणि टॅक्स भरत नसल्यास दंड देखील सोपानराव वडापाववाले ह्या विक्रेत्यांना लावलेला होता. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात अहमदनगर जिल्ह्यातील सोपानराव वडापाव वाले च्या बरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील चिंटू वडेवाले, त्याचबरोबर नागपूर शहरातील रामू वडेवाले, नाशिक शहरातील शंभू वडा पाव वाले हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आपल्या खास वैशिष्ट्याने बनवीत असणाऱ्या वडापावसाठी ओळखले जातात.!! पुण्यातील जोशी वडेवाले,  महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने वेगवेगळे वडापाव विक्री करणारे व्यवसायिक वडापाव विक्रीच्या व्यवसायातून आपली वेगळी ओळख निर्माण करून बसलेली आहे.

आज जागतिक वडापाव दिनानिमित्त, मावळ तालुक्यातील, तळेगावातील सुप्रसिद्ध भोर वडेवाले.  मागील 55 वर्षापासून वडापावचा  व्यवसाय करणारे  भोर यांचा वडापाव .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!