आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

तळेगाव दाभाडे शहर म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेली भुमी.सुमारे 138 वर्षांपासून म्हणजेच सन 1884 पासून तळेगाव दाभाडे शहरात नगरपरिषदेचे कामकाज सुरु आहे. सध्या असलेल्या नगरपरिषदेच्या इमारतीचे उद्घाटन1976 साली झाले होते. 46 वर्षे पूर्ण होत असलेली ही इमारत जीर्ण झाली असल्यामुळे नवीन भव्य प्रशासकीय इमारत याठिकाणी उभारण्यात येणार आहे.त्यासाठी जुनी इमारत पाडणे आवश्यक आहे.

नगरपरिषदेचे कार्यालय भव्य दिव्य असावे असे शहरातील प्रत्येकाला वाटत होते.त्यादृष्टीने तसा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे सादर करण्यात आला.

Spread the love
  • तळेगाव दाभाडे शहर म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेली भुमी.सुमारे 138 वर्षांपासून म्हणजेच सन 1884 पासून तळेगाव दाभाडे शहरात नगरपरिषदेचे कामकाज सुरु आहे. सध्या असलेल्या नगरपरिषदेच्या इमारतीचे उद्घाटन 1976 साली झाले होते. 46 वर्षे पूर्ण होत असलेली ही इमारत जीर्ण झाली असल्यामुळे नवीन भव्य प्रशासकीय इमारत याठिकाणी उभारण्यात येणार आहे.त्यासाठी जुनी इमारत पाडणे आवश्यक आहे. परंतु या नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये अनेक लोकप्रतिनिधी, कर्मचारी, शिक्षक, सेवकवर्ग आदींनी आपले कर्तव्य बजावले.या इमारतीमध्ये 46 वर्ष झालेल्या कारभाराचे साक्षीदार अनेकजण आहेत.खुप आठवणी या वास्तुसोबत जोडलेल्या आहेत.नगरपरिषद कार्यालय या शहराच्या विकासाचे केंद्रबिंदू आहे.
    नगरपरिषदेची जुनी इमारत पाडणे व नवीन इमारतीचा आराखडा सादर करणे याबरोबरच सर्व माजी लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांना सन्मानित करायचे यासाठी ‘कर्तव्य कृतज्ञता मेळावा’ आयोजित करून सन्मान करण्यात आला. तळेगाव शहराच्या जडणघडणीत, विकासात सर्वांचे योगदान फार मोठे आहे.जुनी वास्तु पाडत असताना तेथील आठवणींना उजाळा देत भावनिकता अनेकांनी व्यक्त केली. याच सभागृहातून माझ्या राजकीय कारकिर्दीस देखील सुरुवात झाली व मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली.

नगरपरिषदेचे कार्यालय भव्य दिव्य असावे असे शहरातील प्रत्येकाला वाटत होते.त्यादृष्टीने तसा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे सादर करण्यात आला आणि सुमारे 40 कोटी रु.निधीचीअवश्यकता भासणार आहे, त्यापैकी १९ कोटी मंजुरी त्यास मिळालीअसे मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी आपल्या  मनोगतात मांडले .नवीन सुसज्ज इमारतीमुळे शहराच्या नावलौकिकात नक्कीच भर पडणार आहे. तसेच नागरिकांच्या अनेक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.ही इमारत जरी इतिहासजमा होत असली तरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक आठवणी जतन ठेवण्याचा प्रयत्न आपण करुयात. या मेळाव्यास उपस्थित राहिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, शिक्षक, कर्मचारी       सर्वांचे मनापासून    स्वागत मुख्याधिकारी सरदेसाई यांनी केले तसेच मा.नगराध्यक्षा रंजनाताई भोसले यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!