ताज्या घडामोडी

शेडगेवाडीचे सुपुत्र सोपान शेडगे ‘सांगलीरत्न’ पुरस्काराने सन्मानित

Spread the love

कोकरुड/वार्ताहर

शेडगेवाडी ता.शिराळा गावचे सुपुत्र सोपान शेडगे यांना मुंबई येथे सांगली जिल्हा विकास संघाच्या वतीने ‘सांगलीरत्न’ पुरस्काराने ए.सी.पी. शशिकांत माने यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह , पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सोपान शेडगे हे गेली १८ वर्षे शिल्पकार एज्युकेशन संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यी, शिक्षक, डॉक्टर, वकील, पत्रकार, पोलिस कर्मचारी, अधिकारी,नेव्हीचे अधिकारी, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील अधिकारी तसेच जेलमधील कैदी असे सुमारे सहा लाख लोकांना मार्गदर्शन केले आहे. याचीच दखल घेऊन सांगली जिल्हा विकास संघाच्या वतीने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.यावेळी ए.सी.पी.मीरा बनसोडे, सांगली जिल्हा विकास संघाचे संस्थापक संभाजी लोखंडे, कांचन माने,ॲड.बाळासाहेब जाधव, लक्ष्मण जाधव, आशा माने मधुकर लोखंडे,पोपट खरात, शुभम लोखंडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!