ताज्या घडामोडी

कसबे डिग्रज सर्व सेवा सोसायटीच्या निवडणुकीतील विजयी संचालकांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

Spread the love

इस्लामपूर दि. १९ (प्रतिनिधी)
कसबे डिग्रज सर्व सेवा सोसायटीच्या निवडणुकीतील विजयी संचालकांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सांगली मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक दिलीपतात्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी विजयी संचालकांचे कारखाना कार्यस्थळावर स्वागत केले.
महाविकास आघाडी शेतकरी सहकारी पॅनेलचे प्रमुख,जि.प.सदस्य विशाल चौगुले, राजेंद्र जाधव,बाळासाहेब शिंदे,आप्पासाहेब जाधव,सदाभाऊ कदम,अशोकभाऊ चव्हाण, संतोष पिंपळे,दिनकर शिंदे,विश्वानाथ हराळे, गजानन भंडारे,रमेश चौगुले,आबासाहेब सायमोते,तसेच नूतन संचालक अजितकाका आपटे,वर्धमान अवधूत,धनजंय फराटे,संजय चव्हाण,नंदकुमार चव्हाण,विजय जाधव, सत्यजित सलगर,विनोद सायमोते,वासिम जमादार,सुभाष कांबळे,सौ.कांचन शिंदे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!