ताज्या घडामोडी

नरसिंहपूर ग्रुप सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी प्रणित स्वाभिमानी पॅनेलची विजयी हॅट्रिक

Spread the love

इस्लामपूर दि.१९ प्रतिनिधी
नरसिंहपूर ग्रुप सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी प्रणित स्वाभिमानी पॅनेलची विजयी हॅट्रिक झाली असून पॅनेलचे नेते व विजयी संचालकांनी राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी विजयी संचालक व नेत्यांचे कारखाना कार्यस्थळावर स्वागत केले.
य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्या चे माजी संचालक संपतराव सावंत (पाटील), राजारामबापू सहकारी दूध संघाचे संचालक बबनराव सावंत,उद्योजक दिपकराव पाटील, शशिकांत सावंत,प्रकाशराव पाटील,गुलाबराव पाटील (कोळे) यांनी विजयी पॅनेलचे नेतृत्व केले.
विजयी उमेदवार-संपतराव सावंत (पाटील),वसंतराव पाटील,दिलीप कुलकर्णी, दिपकराव पाटील,आनंदराव पाटील,सुर्यकांत पाटील,जयवंत पाटील, संतोष शिंदे,भूपाल साळुंखे,रमेश गवाळे,कोमल पाटील,अलका गरुड. सरपंच प्रवीण सावंत,जगदीश साळुंखे, जगदीश पाटील,ग्रामपंचायत सदस्य शशिकांत पाटील,रविंद्र पाटील,आबासाहेब पाटील, संग्राम पाटील यांनी या विजयात मोलाचे योगदान केले आहे.
आम्ही ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. काही मंडळींनी निवडणूक लादली. निवडणूक चुरशीची होईल,असे वाटत होते. मात्र सभासदांनी आमच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. आम्ही सभासदांचा विश्वास सार्थ करू, अशी ग्वाही नेत्यांनी यावेळी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!