ताज्या घडामोडी
पालघर जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रकाश निकम तर उपाध्यक्ष पदी पंकज कोरे यांची बिनविरोध निवड
प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया बुधवारी (दि. १६) पार पडली असून जिल्हा परिषद अध्यक्ष पदी प्रकाश निकम तर उपाध्यक्ष पदी पंकज कोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद सर्वसाधारण सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळी अन्य कुणाचाही अर्ज न दाखल न झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी अनुक्रमे प्रकाश निकम व पंकज कोरे यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे पीठासीन अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी जाहीर केले.