ताज्या घडामोडी

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य -मा श्री प्राचार्य अभयकुमार साळुंखे

Spread the love

कोरोना च्या काळात गेली दोन वर्षापासून अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट ने सातारा सांगली सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी पुणे रायगड या सातही जिल्ह्यातील डोंगर दऱ्याखोऱ्यातील गोरगरीब मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करुन व महापुरात व अतिवृषटीत नुकसान झालेल्या भागातील व दरड ग्रस्त भागातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अहोरात्र प्रवीण काकडेसाहेब यांनी केले. हे कार्य असेच पुढे जाण्यासाठी त्याना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन साळुंखे यांनी केले प्रवीण काकडेसाहेब यांनी कोरोना काळात शैक्षणिक साहित्य वाटप ३२९३ मुलांना मदत केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे शशीराव शेंडगे याच्या पुतणीच्या लग्न समारंभात अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट ला शशीराव शेंडगे यांनी अभयकुमार साळुंखे साहेब यांचे शुभ हस्ते मा प्रवीण काकडेसाहेब अध्यक्ष अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट यांना लग्नाचे औचित्य साधून ५१००० एक्कावन हजार रुपये रोख आर्थिक मदत करण्यात आली या प्रसंगी मा प्रविण काकडेसाहेब याचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी मा कौस्तुभ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था मा आर के भोसले माजी सहसचिव मा उत्तमराव गलांडे चेअरमन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची पतसंस्था मा शशीराव शेंडगे व्हा चेअरमन स्वामी विवेकानंद शिक्षण पतसंस्था इत्यादी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!