ताज्या घडामोडी

विकासाचा ध्यास घेतलेला !! विकास योध्दा* *लोकनियुक्त सरपंच श्री . संजय कदम ( बापू )

Spread the love

वाढदिवस विशेष

वाढ दिवस गुरूवार २६ मे २०२२

वाळवा तालुक्यातील पश्चिम टोकावरील एक छोटसं गाव, ते हि चार विभागात विभागलेले घबकवाडी गांव म्हणजे घबकवाडी, शिंदेवाडी , खोतवाडी व मठ वस्ती असे वसलेले आहे. पूर्वीच्या ओझर्डे गांवाचा चौथा वार्ड सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी गांव स्वतंत्र झाले. त्यापूर्वी म्हणजे शेतात , शेतजमिनीत जिथं आपली जागा आहे तिथं आमच्या लोकांनी वस्ती करायची व छोटी छोटी घर बांधायची व वास्तव्य करायचे अर्शी पूर्वीची परिस्थिती होती. गांवचा अजून ही सिटी सर्व्हे म्हणजे गांवठाण झालेले नाही. गांव छोट असल्याने शासनाकडून सार्वजनिक कामाकरिता निधीही तसा कमी प्रमाणात येतो आता कुठे चांगले रस्ते झाले , गांवात नाली, गटारीची सोय झाली . पिण्याचे पाण्याची सोय झाली. गांव वसल्यापासुन गांवातील स्मशान भूमिकडे जाणारा मुख्य रस्तातर कधीच झाला नव्हता तो धडपडून तयार करण्याचे सर्व च्या सर्व श्रेय हे गांवचे लोकनियुक्त सरपंच श्री. संजय कदम (बापू) यांनाच जाते, कोणताही राजकीय वारसा नसताना गांव – तालुका – जिल्हा या ठिकाणी कामे करण्याचा प्रवास थक्क करणारा आहे म्हणून तर जनमानसात नावारूपाला आलेले नेतृत्व म्हणून लोकनियुक्त सरपंच श्री. संजय कदम यांच्याकडे पाहिले जाते. राज्य सरकारचा असो . केंद्र सरकारचा असो , अगर आमदार , खासदार , जिल्हानियोजन, जिल्हा परिषद, पंचायत समिती असा कोणाताहि निधी आपल्या गांवासाठी कसा उपलब्ध होईल व गांवातील लोकांच्या अडी अडचण कश्या दूर होईल याचा सतत ध्यास घेणारे नेतृत्व म्हणून सरपंच श्री. संजय कदम (बापू) यांचे नांव झाले आहे. गांवचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा संजयबापूंच्या नावाचा आलेख हा क्रमांक एक वर राहिल यात तिळमात्र शंका नाही. गांव लहान असल्यामुळे तशी राजकिय क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात खळबळ असतेच. परंतु गावाचे लोक नियुक्त सरपंच या राजकारणाला अत्यंत गोडी गुलाबीने घेतात. चार दिवस राजकारण व लगेच सर्व विसरून माझा गांव हे माझच आहे. इथला मी प्रथम नागरीक आहे. हि भूमिका मनात घेवून सर्व मतभेद बाजूला सारून पुन्हा विकासाची कास धरणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. गांवात एकादा तेढ निर्माण झाला तर तो कसा सोडवावा याचे मगक त्यांना सापडलेले आहे . त्यामुळे सर्व नागरीकांना आपलेशे सरपंच नेहमीच वाटत असतात अशी किमया शक्य करण्याचे भाग्य सरपंच संजय कदम यांना मिळाले आहे.

सकाळी उठल्या पासुन संध्याकाळी विश्रांती पर्यंत विकासासाठी कार्यमग्न राहणे , सतत लोकांच्यात मिसळणे , आपल्या गावातील मुलं शिकली पाहिजेत यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत सतत लक्ष असते . सद्या ग्रामपंचायतीची आधुनिक इमारत बांधून ऐका छताखाली सर्व काहि आणण्याचा यशस्वी प्रयत्न चालू आहे . यासाठी निधी हि प्राप्त झाला आहे . तसेच पानंद रस्ते , मुख्य रस्ते , गावातील गल्ली बोळ , गटारीची कामे , काँक्रेटची कामे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था निठ ठेवण यासाठी तसेच शेतकरी गट निर्माण करून गट शेती करावी, कृषी विभागाच्या सर्व योजना लागु व्हाव्या तसेच शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी ही स्वतःच्या संकल्पनेतुन दुग्ध. केंद्र ही ते स्वतः चालवितात, गावातील सर्व सन, उत्सव निटनेटकेपणाने करण्याची त्यांची एक ढप वेगळीच असते, स्मशानभूमीची ढागढूगी करणे तिथे काँक्रेटीकरण व पेव्हिंग फरश्या बसविणे आशा अनेक विकासात्मक कामात ते सतत अग्रही पणे व न थकता मग्न असतात . गांवातील तरुणांनी बाहेर गावातील विकास कसा आहे हे पाहिले पाहिजे यासाठी गावातील प्रमुख मंडळीना घेवून त्यांनी नुकताच औरंगाबाद येथील पाटोदे गावाला भेट दिली . इथला विकास पाहिला आणी संकल्पना केली कि असेच माझ गांव तयार झाले पाहिजे यासाठी नुकताच त्यांनी पाटोद्याचे आदर्श सरपंच श्री. भास्करराव पेरे पाटील यांचा जाहिर व्याख्यानाचा कार्यक्रम छोट्याश्या गावात आयोजीत करून लोकांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्याच काम केले आहे . असे सर्व गुण संपन्न असणारे आमच्या गावचे पहिले लोक नियुक्त सरपंच श्री. संजय कदम ( बापू ) यांचा आज वाढ दिवस बापूंना वाढ दिवसा निमित्त गावातील सर्व ग्रामस्थांच्या म्हणजे घबकवाडी, शिंदेवाडी, खोतवाडी, व मठ वस्ती तील सर्वांचे वतीने वाढ दिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा ….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!