ताज्या घडामोडी

शिराळा उप जिल्हा रुग्णालयात मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान मार्फत अपंग व दिव्यांगांसाठी शिबिर सम्पन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / शिराळा येथील उप जिल्हा रुग्णालयात आज (ता. १५) मानसिंग भाऊ लोककल्याण अभियान मार्फत अपंग व दिव्यांगासाठी शिबीर घेण्यात आले. हे शिबीर शिराळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मानसिंगराव नाईक यांच्या २६ जून रोजी साजरा होणाऱ्या वाढदिवसाच्या औचित्याने घेण्यात आले.
अपंग व दिव्यांगांना सांगली पर्यंत मारावे लागणारे हेलपाटे वाचावेत हा हे शिबीराच्या आयोजनामागील हेतू होता. आजच्या शिबिरात अस्थिरोग तज्ञ डॉ. विशाल ठोंबरे यांनी ५९ रुग्ण तपासले त्यापैकी प्रमाणपत्रास पात्र ३२ जण ठरले. मानसोपचार तज्ञ डॉ. गजानन साकेकर यांनी २४ रुग्ण पाहिले रुग्ण त्यापैकी ११ जण प्रमाणपत्रास पात्र ठरले. नेत्र चिकित्सक डॉ. दिपाली खरात यांनी २० रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी १ जण प्रमाणपत्रास पात्र ठरला. शिबिरात एकूण १६० रुग्ण सहभागी झाले. त्यापैकी रुग्णांची तपासणी झाली. त्यापैकी तपासणीस पात्र १०५ ठरले, तर प्रमाणपत्रासाठी पात्र ४६ जण ठरले. या पत्र रुग्णांना आमदार मानसिंगभाऊंच्या वाढदिवसादिवशी केले जाणार आहे. दरम्यान सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी शिबिरास भेट दिली. रुग्णांची सोई-सुविधेबाबत विचारपूस केली. डॉक्टरांशी व अभियानातील स्वयंसेवकांशी चर्चा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!