ताज्या घडामोडी

यशवंत आयुर्वेद महाविद्यालयामधे योग सप्ताहास सुरुवात

Spread the love

जगभरामधे आज योगा विद्येला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे.योगामुळे शरीराचे अनेक व्याधी समूळ नष्ट केले जातात.योगामुळे शरीर लवचिक बनते.
21 जून हा जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय कोडोली येथे दि.14 ते 21 जून दरम्यान योग सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. यामधे योग प्रदर्शन,योग चिकित्सा तसेच योग माहितीपट दाखवला जाणार आहे.नागरिकंनी या योग सप्ताहाचा लाभ घेण्याचं आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलं आहे.
या योग सप्ताहाचे उद्घाटन यशवंत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ.जयंत पाटील यांच्याहस्ते झाले.यावेळी प्राचार्य डॉ.मिलिंद गोडबोले,डॉ.एस.जी.कुलकर्णी,डॉ.सूर्यकिरण वाघ,विभाख प्रमुख डॉ.कल्पना जाधव,डॉ.अभिजीत माने,डॉ.गजानन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!