ताज्या घडामोडी

स्वाती शृंगारपुरे लिखित व यशोकीर्ती प्रकाशनाद्वारे प्रकाशीत”स्वातीचे शब्दमोती”या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

Spread the love

मुंबई(गुरुनाथ तिरपणकर)-कविता,ललित लेख,कथा,चारोळ्या अशा विविध प्रकारचे लेखन करणा-या बोरीवलीच्या कवियत्री सौ.स्वाती शृंगारपुरे यांच्या पुस्तकाचे नुकतेच बोरीवली येथे प्रकाशन झाले.सौ.स्वाती शृंगारपुरे लिखित व यशोकीर्ती प्रकाशनाद्वारे प्रकाशीत”स्वातीचे शब्दमोती”या कविता,कथा,ललित स्वरुपातील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.सुप्रसिद्ध कवी आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ सदस्य श्री.प्रसाद कुळकर्णी यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन झाले.कवियत्री,निवेदिका,सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती पाटसकर या प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित होत्या.निवेदिका पल्लवी वढवेकर बर्वे यांनी खुमासदार निवेदन करत कार्यक्रम रंगतदार केला.तसेच माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी व भाजपा उत्तर मुंबई जिल्हा पश्चिम महाराष्ट्र आघाडी अध्यक्ष श्री.अजित डोंगरे यांनी उपस्थितीत राहुन शुभेच्छा दिल्या.श्री.सुबोध शृंगारपुरे यांनी या संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले.सौ.खुशी कुशल दास यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!