आरोग्य व शिक्षणमावळ

कचरा कमिटीचा अहवाल गुलदस्त्यात. योगेश पारगे

Spread the love

कचरा कमिटीचा अहवाल गुलदस्त्यात. योगेश पारगे.Report of the Garbage Committee in Bouquet. Yogesh Parg.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १ ऑक्टोबर.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट मधील गलथान कारभाराविरुद्ध सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनादरम्यान मुख्याधिकारी एन के पाटील यांनी आंदोलन कर्त्याना कचरा व्यवस्थापनाबाबत कमिटी स्थापन करणार असून त्या कमिटीच्या अहवालानुसार कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले होते परंतु आज तीन महिने झाले तरीदेखील कचरा कमिटीचा अहवाल उपलब्ध झालेला नाही नगरपरिषदेमध्ये चौकशी केली असता कचरा कमिटी बाबत अजून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही असे कळवण्यात आले होते त्यामुळे कचरा कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी नगरपालिकेतील एक बडा अधिकारी प्रयत्न करत असल्याचे उघड होत असून कचरा कमिटीचा अहवाल गुलदस्त्यात असल्याचे काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष योगेश पारगे यांनी नमूद केले आहे.

नगरपरिषदेमार्फत योगेश पारगे यांना जावक क्रमांक 3/3603/2023, चे पत्र देण्यात आले व त्या पत्रात नमूद केले होते की दिनांक 26/7/2023 रोजी समिती गठीत करून कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत योग्य ती तपासणी करून त्याचा अहवाल सादर करणार आहे परंतु कचरा कमिटी गठीत न करता सदर कचरा कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्याचा प्रयत्न मुख्याधिकारी पाटील यांनी केलेला आहे, कचरा कॉन्ट्रॅक्टरच्या सर्व चुका गुपचूप पणे पूर्ण करून कचरा कॉन्ट्रॅक्टरला धुतल्या तांदळासारखा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न पाटील यांनी केलेला आहे हा त्यांचा प्रयत्न संशयस्पद असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पारगे यांनी केली आहे.कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत कमिटी स्थापन केली परंतु कमिटी कडून कुठलीही हालचाल झालेली नाही ही सरासर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये फेकलेली धूळ असून नागरिकांच्या पैशावर मारलेला डल्ला आहे असा आरोप पारगे यांनी केला आहे.

कचरा कमिटीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून कचरा कॉन्ट्रॅक्टर वरती कारवाई करणे अपेक्षित असताना कचरा कमिटी ची चौकशी जाणून बुजून न करण्याचा घाट नगरपरिषदेमार्फत घालण्यात आल्याने सर्व प्रकरणात संशय निर्माण झाला आहे त्यामुळे लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणी लक्ष घालून  एन के पाटील यांच्यावरती चौकशी अंती योग्य ती कारवाई करण्याची मागणी योगेश पारगे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!