ताज्या घडामोडी

मांगले येथील मोरणा विकास सोसायटी निवडणूक बिनविरोध.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / मांगले (ता. शिराळा) येथील मोरणा विकास सोसायटीची निवडणूक सत्यजीत पाटील व नविनकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली. आज बिनविरोध निवड झालेले सदस्य व नेते मंडळींनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी भेट घेतली. यावेळी आमदार नाईक यांनी निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. शेतकरी हिताचे निर्णय घेत आदर्शवत काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. बिनविरोध निवडून आलेले सदस्य असे : जयवंत धोंडी चौगुले, संजय बाबुराव खामकर, अशोक नाथा जगताप, मन्सूर रहिमान मुलाणी, आनंद मारुती पटेकरी, मनोज महादेव शेवडे, शिवाजी बापू कालेकर, विजय रामचंद्र गराडे, भालचंद्र बाबुराव पाटील, शरद भिवा मोहिते, शरद आनंदराव मदने, उज्वला रामचंद्र पाटील, विजया विलासराव पाटील. यावेळी सत्यजीत पाटील, बाबासाहेब चौगुले, तानाजी चरापले, सचिन शिंगटे व सचिन खोत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!