ताज्या घडामोडी

अहिल्यादेवी यांचे दातृत्वास आणि कर्तृत्वास इतिहासात तोड नाही -प्रवीण काकडे

Spread the love

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी महिला सबलीकरण धार्मिक विचार रोजगार निर्मिती लोकहिताचा सतत विचार करणे नवनिर्मिती आणि कौशल्य विकास कौशल्याने लोकांच्या भल्यासाठीच कृती कार्यक्रमाची आखणी करणे हे त्याचे वैशिष्ट्य होते म्हणुनच अहिल्यादेवी होळकर यांचे दातृत्वास आणि कर्तृत्वास इतिहासात तोड नाही असे प्रतिपादन प्रविण काकडेसाहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांनी मालदेव ठोसेघर ता जि सातारा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जंयती महोत्सव पठार विभाग सातारा यांनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य शंकर आप्पा चव्हाण हे होते.छत्रपती शिवाजीमहाराज याच्या नंतर तेवढ्याच तोलामोलाचे राज्य कारभार करणारी एकमेव स्त्री म्हणून अहिल्यादेवी होळकर याचेच नाव घ्यावे लागेल. अहिल्यादेवी होळकर याचे नेतृत्व लोकांनी विश्वासाने स्वीकारले व नमलेलया शत्रूला माफ करून शरणात घेण्याचे सामर्थ्य होते म्हणुनच अहिल्यादेवी यांना पुण्यश्लोक ही पदवी बहाल करण्यात आली ही पदवी मिळवणारी एकमेव स्त्री होय. म्हणुनच बहुजन समाजाने त्याच्या विचारावर आणि आदर्शावर महिलांना प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे त्याचा इतिहास नवीन पिढीसमोर आणणे आवश्यक आहे. याप्रसंगी सौ कमल जाधव जिल्हापरिषद सदस्य. सुरेश सावंत संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅक श्रीरंग देवरुखे संचालक बाजार समिती सातारा संगीता अवकिरकर सुवर्णा माने कोडीबा केंडे बाबुराव कोकरे रामचंद्र अवकिरकर. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संजय शेडगे यांनी केले. आभार दिनकर मेळाट यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!