ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येत्या पंचायत समिती,जिल्हा परिषद, नगर पालिकासह सर्व निवडणूकीत एकसंघ ताकद दाखवित पक्षाचा झेंडा फडकवावा

Spread the love

इस्लामपूर दि. १० (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येत्या पंचायत समिती,जिल्हा परिषद, नगर पालिकासह सर्व निवडणूकीत एकसंघ ताकद दाखवित पक्षाचा झेंडा फडकवावा,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी इस्लामपूर येथील कार्यक्रमात केले.
येथील राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन ध्वजारोहण व केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी श्री.पाटील यांनी कार्यकर्त्यांना पक्षाची शपथ दिली. प्रा.शामराव पाटील, राजारामबापू दूध संघाचे नेताजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड.चिमणभाऊ डांगे,भिमराव पाटील,माजी तालुकाध्यक्ष बी.के.पाटील,संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी नगरसेवक खंडेराव जाधव,महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर,माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील,सौ.अरुणादेवी पाटील,माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,संजय गांधी निराधर योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, महिला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनिता देशमाने,युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी प्रतिकूल परिस्थिती मध्ये पक्षाची जबाबदारी खांद्यावर घेऊन राज्यात पक्ष मजबूत करण्यात मोठे योगदान केले आहे. त्यांनी राज्यभर संवाद यात्रा काढून बूथ समित्या मजबूत करताना पक्ष कार्यकर्त्यां च्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे. आज पक्ष सत्तेत असून आता आपण सर्वांनी एकसंघपणे सर्व निवडणुकात ताकद दाखवून द्यायला हवी. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे पक्षाचे सूत्र कार्यकर्त्यांनी आत्मसात करावे.
शहाजी पाटील म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी १९६२ साली काँग्रेस पक्षाची जबाबदारी खांद्यावर घेऊन पक्षाला सत्तेत आणले होते. त्याची पुनरावृत्ती आता ना.जयंतराव पाटील यांनी करून दाखविली आहे. ना.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंडा फडकावून दाखवू. यावेळी महिला तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने,इस्लामपूर शहराध्यक्षा रोझा किणीकर,आष्टा शहराध्यक्षा तेजश्री बोंडे यांनी ना.जयंतराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्हा महिलांना स्वतःची ओळख दिली आहे. आम्ही ना.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असल्याचा सार्थ अभिमान आहे,असे सांगितले. युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीत युवक कार्यकर्ते मोठे योगदान करतील,असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील,अँड विश्वासराव पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष सुर्यवंशी, माजी सभापती सुवर्णा जाधव,कारखान्याचे संचालक विराज शिंदे,दादासाहेब मोरे, माणिक शेळके,बँकेचे संचालक प्रशांत पाटील,दिलीप कदम,पिरअल्ली पुणेकर, शकील जमादार,रफिक पठाण,सचिन कोळी, स्वरुप मोरे,संजय जाधव,विजय लोंढे, शैलेंद्र सुर्यवंशी,सुनील मलगुंडे,विलास बिरु ताटे, युवराज पाटील,उषा पंडीत-मोरे,प्रियांका साळुंखे,शैलजा जाधव,पुष्पलता खरात, सरिता पाटील,नयना पाटील,नंदा पाटील, कल्पना कोळेकर,सायली गोंदील,वैशाली पाटील,मनीषा पाटील,मोहन भिंगार्डे,गोपाल नागे,विशाल सुर्यवंशी,जुबेर खाटीक,रणजित तेवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. युवक तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख यांनी आभार मानले. इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त केक कापताना विजयराव पाटील. समवेत शहाजी पाटील,खंडेराव जाधव,नेताजीराव पाटील, भीमराव पाटील, संजय पाटील,सुनीता देशमाने,रोझा किणीकर,संग्राम जाधव, बी.के.पाटील,तसेच जेष्ठ,महिला व युवक कार्यकर्ते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!