ताज्या घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाची नियोजित बैठक संपन्न.

Spread the love

२ एप्रिल रोजी होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पन सोहळा भव्यदिव्य होण्यासाठी सामिकु मनपा नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांची नियोजन बैठक स्मारक येथे पार पडली.
माजी महापोर सौ. संगिताताई खोत यांनी पक्षनिवेश न बाळगता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या अभुतपुर्व लोकार्पण सोहळ्यासाठी प्रचंड संख्येने सांगली जिल्ह्यातील अहिल्याप्रेमींना आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयास करण्याचे मनोगत व्यक्त करुन बांधवांना प्रत्येकाने २ एप्रिलला सांगलीत येण्याचे आवाहन केले.

नगरसेवक विष्णू माने यांनी चौडी नंतर महाराष्ट्रात दुसरे असे राजमाता अहिल्यादेवींचे पाऊण एकर परिसरात अहील्यादेवींचे स्मारक सामिकु मनपा वतीने केले आहे. मनपाचे वतीने होत असलेल्या या लोकार्पण सोहळ्यास संपुर्ण जील्ह्यातून आणि पश्चिम महाराष्ट्रातून अनुयायांना उपस्थित राहण्यासाठी प्रयास करण्याचे आवाहन केले.
नगरसेवक प्रकाश ढंग यांनी हा अगळावेगळा सोहळा राजमातेच्या कार्यकर्तुत्वास साजेसा होण्यासाठी सर्वांनी ताकदीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
माजी नगरसेवक चंद्रकांत हुलवान यांनी स्मारक परिसरातील नियोजन नेतके करुन कार्यक्रमाची उंची वाढेल याची काळजी घ्यावी अशी सुचना व्यक्त केली.
नगरसेवक सौ. सविता मदने यांनी राजमाता यांच्या कार्याचा आढावा घेत तनमनधनाचे कार्यक्रमास सर्वांनी सहभागी होऊन सांगलीच्या वैभवात भर घालणार्‍या स्मारकाचा लोकार्पण सोहळा तितक्यात शक्तीने सर्वांनी पुर्ण करुयात असे मनोगत व्यक्त केले.
नगरसेवक संजय यमगर यांनी सर्वांनी जबाबदारी विभागून घेवून कार्यक्रम पुर्ण करुयात असे मनोगत व्यक्त केले.
नगरसेवक राजेंद्र कुंभार यांनी या सोहळ्यानिमित्त विविध उपक्रम आयोजित करु असे मनोगत व्यक्त केले.
नगरसेवक मनोजदादा सरगर यांनी सर्वांच्या एकजुटीने हा सोहळा पार पाडण्यासाठी सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासित केले.

यावेळी मा. हरिदास लेंगरे, मा. सुरेश टेंगले, मा. दरिबा बंडगर, मा. अजित खरात, मा. संतोष माने, मा. विजय वाक्षे, मा. तानाजी व्हणमाने, मा. हरिभाऊ सरगर, डॉ. विक्रम कोळेकर, इंजि. शिवाजी शेंडगे, मा. श्रीकांत वाघमोडे, मा. भारत व्हणमाने आदिंनी नियोजनासाठी आवश्यक सुचना देत मनोगते व्यक्त केली,
यावेळी नगरसेवक मा. मनगुआबा सरगर, उद्योगपती पुंडलिकतात्या गडदे, मा. मासाळसाहेब, मा. बंडु सरगर साहेब, उत्तम हराळे, माने सर, मा. दादासाहेब दुधाळ, मा. पांढरे साहेब,अजित दुधाळ, पप्पुसो कोळेकर, राजु चव्हाण, बाळासाहेब खांडेकर, महेश मासाळ, सागर माने, कृष्णात हुलवान, आनंद म्हारगुडे, दिलीप भिसे आदि उपस्थित होते.प्रास्ताविक व सुत्रसंचलन निवांत कोळेकर तर आभार तानाजी दुधाळ यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!