ताज्या घडामोडी

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. सत्यवान मोरे यांची राजन रेडकर यांनी संस्थेच्या वतीने सदिच्छा भेट घेवून केले अभिनंदन.

Spread the love

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे याकरिता भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था व सतर्क पोलीस टाईम्सच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे दिनांक २५ जून २०२१ रोजी बेमुदत आमरण आत्मक्लेश उपोषण करण्यात आले होते. ते उपोषण हे भर पावसात सलग १०२ तास करण्यात आले होते. त्याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.एच.पाटील यांनी दिनांक २९ जून २०२१ रोजी बेमुदत आमरण उपोषण मागे घेण्याबाबत पाचव्या दिवशी विनंती पत्र देण्यात आले. त्या पत्रात महाराष्ट्र शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे स्थापन करण्यासाठी मान्यता दिल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग हे कायमस्वरूपी वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाकरिता शासनाने शासननिर्णयान्वये आवश्यक पदे मंजूर केलेली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई नुसार प्राध्यापक तदर्थ, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक याच्या प्रतिनियुक्ती येथे करण्यात आल्याचे नमूद केले आहे.
संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनसामान्यांना जनहितार्थ मूलभूत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात हे एकमेव उद्दिष्ट ठेवून, सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आलेल्या बेमुदत आत्मक्लेश आमरण उपोषणाची आठवण राजन रेडकर यांनी डीन डॉ. मोरे यांना करून दिली. त्या उपोषणात भूषण मांजरेकर, सौ. रीमा मेस्त्री, सौरभ नागोळकर, राजाराम चिपकर व राजन रेडकर यांनी सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नासाठी तसेच रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना बांभुळी गोवा मेडिकल कॉलेज, कोल्हापूर, मुंबई येथे उपचार घेण्याकरिता जावे लागे, त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचे हाल होवून रुग्ण दगावत असत व रुग्णांचा उपचार देखील खर्चिक होत असे. त्यामुळे सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होवून जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरावीत याकरिता उपोषण केले होते. त्या उपोषणा दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, डॉ.श्याम पाटील व इतर सर्व वैद्यकीय अधिकारी व स्टाफ यांनी कोरोना काळात उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करून जे सहकार्य केले याकरिता त्यांचेही आभार मानण्यात आले.
डीन डॉ. सत्यवान मोरे यांनी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्यात नविन डॉक्टर तयार होऊन स्थानिक रुग्णांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सोईसुविधा व उपचार मिळणार असून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहेत. त्याकरिता जिल्ह्यातील रुग्णांना आता औषधोपचार घेण्याकरिता जिल्ह्याबाहेर जाण्याची आवश्यकता नाही असे मत व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय जी सामंत, खासदार विनायक राऊत व इतर लोक प्रतिनिधींनी तसेच महाविद्यालयाचे डीन डॉ.सत्यवान मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, डॉ.श्याम पाटील तसेच इतर वैद्यकीय अधिकारी यांनी सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे याकरिता जे प्रयत्न केले त्यांसर्वांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. सत्यवान मोरे यांना संस्थेच्या वतीने राजन रेडकर यांनी सतर्क पोलीस टाईम्सचा अंक व आठवण म्हणून स्मृतिचिन्ह देवुन सन्मानित केले त्यावेळी संस्थेचे जिल्हा सहसचिव राजेश सातोसकर हेही उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!