ताज्या घडामोडी

विराथन येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व वह्या वाटप

Spread the love

पालघर प्रतिनिधी
शिक्षण अभ्यासक व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेमार्फत अभिनव विद्यालय विराथन येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व वह्या वाटप कार्यक्रम गुरुवारी( दि.१६) संपन्न झाला.

यावेळी मार्गदर्शन करतांना जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या कार्यकर्त्या कार्तिकी चुरी यांनी सांगितले की, आपल्या स्वकमाईतून ८० टक्के रक्कम संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे समाजातील गरजूंसाठी वापरत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, क्रीडा व रोजगार यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत दाखल व्हावे यासाठी यूपीएससी आणि एमपीएससी सारखे वर्ग विनामूल्य चालवले जात आहेत. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. अभिनव विद्यालय विराथनच्या मुख्याध्यापिका नेहा किणी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करून आपल्या बरोबरच आपल्या समाजाचेही नाव कमवावे. जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचा आदर्श आपणासमोर ठेवावा. संस्थेने विद्यार्थ्यांना वह्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील यांनी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचा संपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. आत्ताच्या महागाईच्या युगात विद्यार्थ्यांना साहाय्य करणाऱ्या दात्यांचे ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कलाशिक्षक महेंद्र पाटील यांनी केले.
याप्रसंगी शाळेचे शिक्षक, जिजाऊ संस्थेचे सागर किणी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!