ताज्या घडामोडी

गोवंडी पोलीस ठाणे मोहल्ला आणि शांतता कमिटीची बैठक चेंबूरमध्ये संपन्न

Spread the love

मुंबई – आगामी सण,
निवडणुका आणि अतिरेकी कारवायांच्या धमकीच्या पार्श्‍वभूमीवर गोवंडी पोलीस ठाणे अंतर्गत मोहल्ला व शांतता कमिटीची एक विशेष बैठक नुकतीच चेंबूरच्या घाटले परिसरातील खारदेवनगर भाजी मार्केटमधील छत्रपती शिवाजी सेवा मंडळाच्या मंडपात पार पडली.

या बैठकीला विशेष मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्यक पोलीस अधिकारी जगदेव कालापाड,गोवंडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर,पोलीस निरीक्षक तुकाराम कोयंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान रिठे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन छत्रपती शिवाजी सेवा मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे आणि पोलीस हवालदार राजेंद्र वाघमारे यांनी केले. या बैठकीत स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावत आपल्या समस्या आणि तक्रारी मांडल्या.या बैठकीला परिसरातील विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीसुद्धा हजेरी लावली होती.या बैठकीत वरीष्ठ पोलीस निरीक्षक होनवडजकर यांनी नागरिकांच्या तक्रारीवर गोवंडी पोलीस ठाण्याकडे नागरिकांच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस बळ कमी असल्याचे कारण सांगितले.
तर सहाय्यक पोलीस निरीक्षक कालापाड यांनी नागरिकांनी मांडलेल्या तक्रारीचे निवारण करण्याबाबतच्या सूचना उपस्थित पोलीस अधिकार्‍यांना जागेवरच दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!