ताज्या घडामोडी

मांगले येथे बौद्धविहार भूमिपूजन व विकास कामांचे उदघाटन सम्पन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / मांगले (ता. शिराळा) येथे बौध्द विहार भूमिपूजन व पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे उद्‌घाटन समारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी सुकन्या समृध्दी योजनेतून शंभर पेक्षा जास्त मुलींना प्रत्येकी तीन हजार रुपये, वीस मागासवर्गीय अपंगांना प्रत्येकी तीन हजार रुपये पोस्टात ग्रामपंचायतीमार्फत त्यांच्या नावावर जमा करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांचे तसेच बारा दुर्धर जाराने त्रस्त रुग्नांना प्रत्येक पाच हजार प्रमाणे रोख आर्थिक मदत देण्यात आली. तसेच 275 पहिली ते 15 वी पर्यंतच्या सर्व मुलामुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आंबेडकर चौकात पेव्हीग ब्लॉक बसवणे, रस्ते, गटर इत्यादी कामांचा लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात विश्वासचे संचालक संदीप तडाखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी पंचायत समिती सदस्य विजयकुमार पाटील, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष विराज नाईक, आमदार मानसिंगभाऊ व राज्यमंत्री नाईकसाहेब यांनी मनोगते व्यक्त केली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, तालुक्याचे माजी उपसभापती प्रल्हाद पाटील, बिऊरचे सरपंच सुखदेव पाटील, विश्वासचे संचालक सुरेश पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, माजी संचालक जयवंत पाटील, सरंपच मिनाताई बेंद्रे, वारणा कारखाना संचालक विजय पाटील, डॉ. सतिष पाटील, माजी सरपंच राहूल पवार व उदय पाटील, सत्यम पाटील, रमेश व सुनिल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. आभार रघुनाथ मोहिते यांनी मानले. तिरंगा ग्रुपने कार्यक्रमाचे नियोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!