ताज्या घडामोडी

शिराळा येथे सौ.सुनीतादेवी नाईक यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणे किट वाटप

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / शिराळा येथे तालुका कृषी विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गळीत धान्य योजनेअंतर्गत सोयाबीन मिनी किट वाण जे. एस. – २०३४ या बियाणाचे वाटप आपला बझार समुहाच्या अध्यक्ष सौ. सुनीतादेवी नाईक यांचे हस्ते करण्यात आले. तालुक्यातील जे शेतकरी कोरोना आजाराने मृत झाले आशा ७५ जणांच्या पत्नीला व इतर सर्वसाधारण १२५ शेतकरी यांना मोफत किट वाटण्यात आले. यावेळी तहसिलदार गणेश शिंदे सहाय्य गट विकास अधिकारी अरविंद माने, एकात्मिक बाल विकास अधिकारी नवले, तालुका कृषी अधिकारी जी. एस. पाटील, आत्मा सल्लागार समिती अध्यक्ष राजेंद्र दशवंत आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!