ताज्या घडामोडी
कापुसखेड सोसायटी नं.१ च्या अध्यक्ष,उपाध्यक्ष सत्कार
.शिराळा प्रतिनिधी / कापूसखेड ता. वाळवा येथील सोसायटी नंबर १ च्या नवनिर्वाचीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक सत्कार समारंभ सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष विजय पाटील (बापू) यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी युवा नेते प्रदीप पाटील, नवनियुक्त अध्यक्ष जयदीप पाटील, उपाध्यक्ष बाजीराव पाटील, जयवंत नांगरे, श्रीकांत पाटील, जयकर पाटील, संचालक सर्वश्री. हणमंत जाधव, रमेश खराडे, भास्कर पाटील, दिलीप पाटील, जयकर पाटील, प्रशांत पाटील, बेबीताई पाटील, शिलाताई पाटील, दिलीप सुपने, पोपट माळी, विनायक धुमाळे आदी उपस्थित होते.