क्रीडा व मनोरंजन

युनिव्हर्सिटी सायक्लोथॉन रविवारी रंगणार

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

मुंबई : मुंबई जिल्हा हौशी सायकलिंग संघटनेतर्फे १२ जानेवारी रोजी अल्पाइन बाईक्स युनिव्हर्सिटी सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात जे. पी. नाईक भवन, प्रवेशद्वार क्रमांक २ येथे होणाऱ्या या सायक्लोथॉनमध्ये १२, १६, १८ वर्षे, पुरुष आणि महिला गटाची शर्यत रंगेल. १२ वर्ष गटासाठी २.५ किलोमीटर, १६ वर्षे गटातील मुलांसाठी ७.५ किलोमीटर, मुलींकरता ५ किलोमीटर, १८ वर्ष गटाच्या मुलांकरता १० किलोमीटर, मुलींकरता ७.५ किलोमीटर, पुरुष गटासाठी १२.५ किलोमीटर आणि महिलांकरता १० किलोमीटर अंतराची शर्यत असेल. स्पर्धेविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि क्यू आर कोडसाठी मुंबई जिल्हा हौशी सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष अनिल तांबे (९८२१९३२३८७) किंवा सुभाष पोवळे ( ९९२३७५२४०२) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!