ताज्या घडामोडी

न्यू इंग्लिश स्कुल येथे जागतिक योग दिवस साजरा.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / न्यू इंग्लिश स्कूल शिराळा येथे 21 जून जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एन.सी.सी. ऑफिसर अरुण हाके सर यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी. कॅडेट्स व विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनी योगा अभ्यास केला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अंगराज माजगावकर सर यांनी विद्यार्थ्यांना योग साधनेचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच योग साधनेचे महत्त्व जाणून देऊन नियमितपणे योग करावा व निरोगी राहण्यासाठी योग साधनेची आवश्यकता विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आली.
यावेळी योग शिक्षक सुजित यादव यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची योगासने व त्यांचे महत्त्व सांगितले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए. पी. माजगावकर सर तसेच वरिष्ठ शिक्षक श्री एन.आर. यादव सर उपस्थित होते विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!