ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ सफाळे तर्फे परिसरातील ५ó शाळांना प्रथमोपचाराच्या सुविधा

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत शारीरिक दुखापत झाल्यानंतर तत्काळ प्रथमोपचार मिळावा यासाठी लायन्स क्लब ऑफ सफाळे तर्फे सफाळे परिसरातील ५० शाळांना प्रथमोपचार पेटी वितरण नुकताच करण्यात आले.

लायन्स क्लब ऑफ सफाळेच्या माध्यमातून केंद्र शाळा पारगाव व केंद्रशाळा सफाळे १ येथे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रथमोपचार कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करून प्रथमोपचार पेटी देण्यात आल्या.

यावेळी सफाळे लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन नितीन वर्तक, सेक्रेटरी प्रमोद पाटील, पारगाव शाळा विकास समितीचे अध्यक्ष मोरेश्वर पाटील, सफाळे लायन्स क्लबचे उपाध्यक्ष विकास वर्तक, उपाध्यक्ष दिनकर वर्तक, लायन राजय चौधरी, लायन संदेश पाटील, लायन जतिन कदम, पारगाव शाळेचे मुख्याध्यापक नितीन राऊत, जिल्हा परिषद शाळा सफाळेचे मुख्याध्यापक निलेश वैती तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, उपस्थित होते.

प्रास्ताविक सादर करतांना लायन्स क्लब ऑफ सफाळेचे सेक्रेटरी प्रमोद पाटील यांनी लायन्स क्लबच्या विविध सामाजिक, शैक्षणिक
उपक्रमांची माहिती दिली तर दिनकर वर्तक यांनी मेडिकल कीटमधील विविध औषधे व आजारांविषयी माहिती दिली. क्लबचे अध्यक्ष नितीन वर्तक यांनी मनोगतात सांगितले की, परिसरातील विविध शाळांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी लायन्स क्लब सदैव तयार असते. कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील लायन्स क्लबने काही शाळांना बोलकी शाळेच्या माध्यमातून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तसेच ऑक्सीजन कॉन्सट्रेटर, सॅनीटायझर्सचे वाटप केले. मेडिकल कीट हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक असल्याने पावसाळ्यात ताबडतोब देण्यात येत आहेत.

पालघर तालुक्यातील पारगाव केंद्रातील १७ प्राथमिक शाळांना तर सफाळे विभागातील १२ प्राथमिक शाळांना प्रथमोपचार पेटिंचे बाटप करण्यात आले. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन नितीन राऊत व प्रगती पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश वैती यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!